Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : 'मी कर्जमाफीबाबत बोललोच नाही'; अजितदादांच्या दाव्यानं शेतकऱ्याला टेन्शन, पाहा स्पेशल रिपोर्ट

ajit pawar News : महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन खूष केलं. मात्र बळीराच्या कर्जमाफीचं काय असा सवाल उपस्थित होतोय. अर्थमंत्री अजित पवार मात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी इच्छुक नसल्याचं दिसतंय. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

बहुमतानं महायुती सरकार सत्तेत आलं. निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रिफांनी म्हटलंय. एकाच पक्षातील दोन जेष्ठ मंत्र्यांनी असं परस्पर विरोधी विधान केल्यानं बळीराजा टेंशनमध्ये आलाय.

तिजोरीच्या चाव्या दादांकडे असल्या तरी राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं बोललं जातंय़. त्यामुळेच सरकारसमोर निधी उभारण्याचं आव्हान आहे. असं असलं तरी भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली आहे. आम्ही अंथरुण वाढवू मात्र शेतकऱ्यांना दिलासा देऊ असं आश्वस्त केलंय.

तिजोरीत खडखडाट असतानाच लाडकी बहिण योजनेचा मोठा आर्थिक भार सरकारवर आहे. लाडकीला खूश केल्यानंतर आता बळीराजालाही खूश करणार की शेतकरी कर्जमाफी केवळ प्रचारासाठीचा जुमला ठरणार याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

Vijay-Trisha Viral Video: अजित कुमारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये CM विजय आणि तृषा कृष्णन एकत्र; व्हिडीओ व्हायरल

Bribe Case : सरकारी कामासाठी लाच घेताना बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं, ठाण्यात खळबळ

Relationship Tips : का वाढतोय घटस्फोटाचा ट्रेंड? जोडप्यांनी सांगितली लग्न तुटण्याची ७ मोठी कारणं

SCROLL FOR NEXT