Minister Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

NCP Crisis: न्यायाचा तराजू अजित दादांच्या बाजूनेच सुटणार: छगन भुजबळ

Minister Chhagan Bhujbal: अजित पवार गट पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह जिंकेल, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय.

Bharat Jadhav

Minister Chhagan Bhujbal In shetakari Melava:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह हे कोणत्या गटाला मिळेल, याप्रकरणी निवडणूक आयोगात सुनावणी चालू आहे. या प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी झाली असता निवडणूक आयोगानं दोन्ही गटाचा युक्तिवाद ऐकून घेतलाय. याप्रकरणाची सुनावणी आता ९ तारखेला होणार आहे. त्यानंतर घड्याळ कोणाच्या हातात जाईल, समजणार आहे. निकाल आपल्याच बाजूने लागेल, असा विश्वास अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी कळवण येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर परत एकदा टीका केली. (Latest News)

अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी छगन भुजबळ, सुनिल तटकरे, नरहरी झिरवळ आदी नेते ही त्यांच्यासोबत आहेत. वणी येथे सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतल्यानंतर कळवण येथील शेतकरी मेळाव्याला अजित पवार आणि इतर नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

राष्ट्रवादी पक्ष घडवण्यात आमचाही खारीचा वाटा असल्याचं ते म्हणाले. आदरणीय नेते पवार साहेब म्हणाले होते, ते कोर्ट कचेरी करणार नाही, आणि तेच तिकडे गेले. माझ्याच बंगल्यावर पक्षाचं नाव आणि चिन्हं ठरवलं होतं. शरद पवार हे म्हणतात ते संस्थापक अध्यक्ष आहेत, पण मग मी सुद्धा संस्थापक प्रांताध्यक्ष आहे की नाही? तुमचा मोठा वाटा पण आमचा पण खारीचा वाटा आहे की नाही ? असा सवाल भुजबळांनी मेळाव्यात उपस्थित केला.

दरम्यान भाजपसोबत सत्तेची चूल मांडल्यानंतर राजकीय वर्तुळातून आणि नागरिकांकडून अजित पवार गटाकडून टीका केली जाते. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, भाजपसोबत आम्ही विकासकामांसाठी गेलो आहोत, हे वारंवार सांगितलंय. आम्ही आधीही कामे केली आहेत. पण आता आमच्यावर टीका केली जातेय. दरम्यान सगळे आमदार आणि खासदार आमच्यासोबत आहेत. एक आमदार हा ३ लाख लोकांचे प्रतिनिधी करणारा आहे. न्यायाचा तराजू अजित दादांच्या बाजूनेच सुटणार, असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT