Ajit Pawar News saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar On Anjali Damania : अंजली दमानियांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; एका वाक्यातच विषय संपवला

दमानियांच्या या दाव्यावर आता अजित पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Political News : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपबरोबर जाणार असल्याचं ट्वीट सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दमानियांच्या या दाव्यावर आता अजित पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar)

काय म्हणाले अजित पवार?

बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांना अंजली दमानियांच्या वक्तव्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार, असं म्हणत अजित पवारांनी यावर अधिक बोलणं टाळलं.

तसेच भाजप पदाधिकारी रविंद्र सळगावकर यांनी अजित पवारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.

यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, "कोणाच्याही जीवाला धोका असेल तर संरक्षण द्यावे. पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावे. माझ्यामुळे धोका होईल असं वाटतं का? मी कायदा पळणारा नेता आहे. राजकीय धोका असू शकतो, शारीरिक धोका असू शकत नाही." असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT