Ajit Pawar vs Anjali Damania Saam Digital
महाराष्ट्र

Ajit Pawar vs Anjali Damania : पुणे अपघात प्रकरणावरून राजकारण तापलं; अंजली दमानियांनीही अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं

Pune Porsche Car Accident Update : अजित पवार यांनी नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली, मात्र या प्रकरणात माझा काही सहभाग नसला तर दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायचं नाही, असं म्हटलं होतं. त्यांचं हे चॅलेंच अंजली दमानिया यांनीही स्वीकारलं आहे.

Sandeep Gawade

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेले पोर्शे कार अपघात प्रकरणावरू अजित पवार यांच्यावर अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते. तसंच त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यावर आज अंजली दमानिया यांचं चॅलेंज स्वीकारत अजित पवार यांनी नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली, मात्र या प्रकरणात माझा काही सहभाग नसला तर दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायचं नाही, असं म्हटलं होतं. आता अजित पवारांचं हे चॅलेंच अंजली दमानिया यांनीही स्वीकारलं आहे.

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्या आरोपांचं अजित पवार यांनी खंडन पत्रकार परिषदेत खंडन केलं. तसंच त्यात कोणीही दोषी असेल, त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणालेत.अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की,त्यांनी केलेल्या आरोपप्रकरणी आणि त्यांनी केलेल्या नार्को टेस्टच्या मागणी प्रकरणी आपण तयार आहे. मात्र दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायंच नाही असं चॅलेंज दिलं होतं.

त्यांच हे चॅलेंज अंजली दमानिया यांनी स्वीकारल आहे. तुम्ही तुमची नार्को टेस्ट करा जर असं खरं ठरलं तुमचा आणि विकासक विशाल अग्रवालचा काही संबंध नाही. तुम्ही यात काही केलेलं नाही. माझा तुम्हाला शब्द आहे यापुढे मी कोणतेही गोष्टीवर वाच्यता करणार नाही. पण मी जे प्रश्न लिहून देईन त्यावरच नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी अट त्यांनी घातली आहे.

तर अंजली दमानिया यांचीच नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी केली होती. दमानिया या नेत्या नाहीत रिचार्जवर चालणाऱ्या आहेत, अशी टीका केली होती. सुपारी मिळाली की मागे लागतात. त्यांचा सीडीआर सरकारने तपासावा. याशिवाय दमानिया कुणाच्या फायद्यासाठी आरोप करतात हे तपासलं पाहिजे, असं चव्हाण म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT