pune news  Saam tv
महाराष्ट्र

ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याने हाती धरलं शिवसेनेचे 'धनुष्यबाण'

pune political news : ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने हाती शिवसेनेचे 'धनुष्यबाण' धरलं आहे.

Vishal Gangurde

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग

अजित पवार गटातील नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

पक्षप्रवेशामुळे आंबेगावत राजकीय वर्तुळात चर्चांना वेध

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता साऱ्यांचं लक्ष जिल्हा परिषदांच्या निवडणुकीकडे लागलं आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे नेतेही उमेदवार देखील निश्चित करू लागले आहेत. शिंदे गटानेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीदरम्यान शिंदे गटाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते, पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे खंदे समर्थक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

अरुण गिरे यांनी साथ का सोडली?

पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव -जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा अरुण गिरे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र या गटातून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी निश्चित झाली. त्यामुळे नाराज झालेल्या अरुण गिरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी 2014 मध्ये वळसे पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अरुण गिरे हे आढळराव पाटील यांच्यासोबत शिंदे शिवसेनेत दाखल झाले होते. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी अरुण गिरे यांनी आढळराव पाटलांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी अरुण गिरे यांनी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT