Ajit Pawar addressing supporters at Pimpri-Chinchwad rally, remembering Sharad Pawar’s leadership. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

Sharad Pawar Tribute By Ajit Pawar: आता पुन्हा एकदा अजित पवारांना काका शरद पवारांची आठवण आलीय.. अजित पवार पिंपरी चिंचवडच्या सभेत नेमकं काय म्हणाले? अजित पवारांना काका शरद पवारांची आठवण का झालीय?

Omkar Sonawane

ऐकलंत... राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या काकांची... शरद पवारांची ...पुन्हा एकदा आठवण आली..ती ही .भाजप, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावेळी ....राष्ट्रवादी एकत्र असताना शरद पवार चुकांवर पांघरुण घालायचे.. असं वक्तव्य करत अजित पवारांनी शरद पवारांची आठवण काढलीय... नेमकं अजित पवार काय म्हणाले? पुन्हा एकदा ऐका

जाहीर सभांमध्ये अजित पवारांनी आपल्या काकांची अशी आठवण येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये.. याआधीही अजित पवारांनी बीडमध्ये थेट चुलत्याच्या कृपेने सगळं काही ठीक असल्याचं वक्तव्य केलं होतं.. तर पिंपरी चिंचवडमध्येही शरद पवारच आपलं दैवत असल्याचं सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती..

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय संघर्ष टोकाला गेला असला तरी पवार कुटुंबाने सण उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येण्याची परंपरा कायम ठेवलीय.. त्यामुळे आताही अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांची आठवण काढल्याने त्यामागे पवारांविषयीचा आदर आहे की दुसरा कुठला उद्देश्य आहे..?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT