MLA Rohit Pawar addressing a press conference in Mumbai, raising doubts over last-minute changes in Ajit Pawar’s travel schedule. saam tv
महाराष्ट्र

ऐनवेळी अजितदादांचं २७ तारखेचं शेड्यूल का बदलण्यात आलं? विमानाची वेळ का बदलली? रोहित पवार यांचा सवाल

Ajit Pawar Plane Crash Mystery : अजित पवार याच्या विमान अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत घातपाताचा संशय व्यक्त केला

Bharat Jadhav

  • अजित पवार विमान अपघातावर संशय अधिक गडद

  • अपघाताच्या दिवशी ऐनवेळी शेड्यूल बदलल्याचा दावा

  • विमानाची वेळ आणि पायलट बदलल्याबाबत सवाल

रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच,आपण अजित पवारांच्या निधनाबद्दल आणि विमान दुर्घटनेसंदर्भाने लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत अपघाताच्या दिवशी ऐनवेळी अजितदादांचे शेड्यूल का बदलण्यात आले, विमानाची वेळ का बदलण्यात आली? पायलट का बदलण्यात आले असे प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी अजित पवार यांचा घातपात झाला असावा या शंकेला वाव असल्याचं म्हटलंय.

घटनेच्या दिवशी आणि दुर्घटनेच्या आदल्या दिवशी अजित पवारांचे शेड्युल बदलण्यात आले होते. त्यावर रोहित पवारांनी यांनी संशय व्यक्त केलाय. अजित पवार यांचा विमान प्रवास हा पूर्वनियोजित नव्हता, तर तो ऐनवेळी बदलण्यात आला होता, असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय. दुर्घटनेच्या आदल्या दिवशी २७ जानेवारीच्या रात्री नेमके काय घडले आणि कोणत्या फाईलमुळे अजितदादांना मुंबईत थांबावे लागले, असा सवालही रोहित पवार यांनी केला.

रोहित पवारांच्या दाव्यानुसार, २७ जानेवारीला संध्याकाळी अजित पवार गाडीने पुण्याला निघणार होते. त्यांचा ताफाही तयार होता. मात्र दोन कारणांमुळे त्यांचा प्रवास रद्द झाला. पूर्व विदर्भातील एक मोठा नेता दादांना भेटायला येणार होता, त्यांना उशीर झाला. यासह एका फाईलसाठी अजित पवारांना थांबावे लागल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.

रोजच्या वेळापत्रकानुसार अजित पवार अधिकाऱ्यांना म्हणाले की, ४-५ तास मी माझी कामे करणार आहे. काही कार्यकर्ते, कर्मचारी यांच्याशी चर्चा करेल. एक फार मोठे नेते त्यांना भेटण्यासाठी येणार होते, त्यांना उशीर झाला त्यामळे अजित पवार सायंकाळी ५ वाजता निघू शकले नाहीत. पूर्व विदर्भातील हे नेते आहेत. सही करावीच लागते, फार महत्वाची फाईल आहे मग ती फाईल कुठे आहे, हे पाहिले गेले तेव्हा ती फाईल घरी नव्हती. ती मंत्रालयाच्या कार्यालयात होती. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत. ती फाईल येईपर्यंत वेळ गेला.

२८ तारखेला टेकऑफ टाइमिंग का बदलण्यात आलं?

अजित पवार हे वैमानिकांना विमान उड्डाण करण्याबाबत विचारणा करत होते. एकदा लोणावळ्याला जाताना धुकं जास्त होतं. त्यवेळी अजित पवार हेलिकॉप्टरनं जात होते. त्यामुळे वैमानिकांनी धुकं जास्त आहे पण हेलिकॉप्टरला डबल इंजिन असल्याचं सांगितलं पण अजित पवारांनी दौरा रद्द केला. अजितदादा धोका कधी पत्कारत नव्हते. घटनेच्या दिवशी मात्र विमानाची नियोजित वेळ ७ वाजण्याची वेळ होती. पण विमान ८.१० ला का निघाले? अजितदादा कायम वेळच्या आधी पोहोचत असायचे. कधीच उशीर करत नव्हते. तर विमानाची वेळ का बदलण्यात आली, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पायलटला मारलं तर सगळा विषय संपतो! अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत 100 टक्के घातपाताचा संशय - रोहित पवार

Pregnant Women Food: प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी काय खावे आणि काय खाऊ नये?

Famous Comedian Death: प्रसिद्ध कॉमेडियनचा अपघातात जागीच दुर्देवी मृत्यू; मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Live News Update: भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई हादरली! दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात तरुणीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT