महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात, कार्यकर्त्यांचे लाडके दादा आणि सडेतोड भूमिका आणि कामाचा भन्नाट सपाटा यासाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय...आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेल्या दादांच्या विमानाच्या अपघातानं अख्खा महाराष्ट्र सुन्न झालाय.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात
8.10 वाजता
मुंबईहून अजित पवारांच्या विमानाचं बारामतीकडे टेकऑफ
8.18 वाजता
वैमानिकाचा एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क
वैमानिकानं हवामानाबद्दल एअर ट्राफिक कंट्रोलला विचारणा
8.35
विमान बारामती विमानतळाजवळ पोहचले
8.42 वाजता
बारामती परिसरात धुके असल्यानं दृश्यमानता कमी
रनवे दिसत नसल्याचं वैमानिकानं एअर ट्राफिक कंट्रोलला सांगितलं
पहिला लँडिंगचा प्रयत्न रद्द
ATCकडून विमान पुन्हा हवेत फिरवण्याचे निर्देश
वैमानिकानं पुन्हा रनवे दिसत असल्याचं ATCला सांगितलं
दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नावेळी वैमानिकाचा 'मेडे कॉल'
विमानानं थेट धावपट्टीवर न येता एक मोठं वळण घेतलं
सुमारे 100 फुट उंचीवर असताना विमानाचा तोल गेला
8.45 वाजता
धावपट्टीवर पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले
जमिनीवर आदळल्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला
या भीषण अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलीय..नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत...
प्रशासकीय पकड असलेला नेता, मिश्किल टिप्पणी करणारा दिलदार माणूस आणि कार्यकर्त्यांसाठी धावून जाणाऱ्या 'दादांच्या अचानक एक्झिटनं राज्यावर दुखाचं सावट आहे... बारामतीच्या ज्या मातीने अजित पवारांना भरभरून प्रेम दिलं, त्याच मातीत अश्रूंचा पूर लोटलाय...त्यामुळे जनसामान्यांच्या या दादा माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.