Rohit Pawar addressing media while raising serious questions over Ajit Pawar’s plane crash investigation. Saam Tv
महाराष्ट्र

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar Questions Ajit Pawar Plane Crash Sabotage: अजित पवार यांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यापासून विमान विमा, पायलट आणि इंधन टँकपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Bharat Mohalkar

अजितदादांचा मृत्यू... आणि त्यानंतर दररोज नव्यानव्या संशयामुळे अपघात की घातपात याचं वाढत चाललेलं गूढ आता नव्या वळणावर पोहोचलंय...कारण रोहित पवारांनी नवा गौप्यस्फोट केलाय.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेमुळेच नाराजांनी हा घातपात केल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केलाय.. त्यासाठीच व्हीएसआर कंपनीनं खोटी कागदपत्रं वापरल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय..दुसरीकडे दारु पिण्यामुळे निलंबित केलेल्या पायलटला कामावर घेतल्यानंतर पैशांसाठी कुणी दबाव टाकला का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय..

रोहित पवार फक्त हे फक्त आरोप करुन थांबलेले नाहीत... तर त्यांनी दादांच्या विमानाचा अपघात होण्यापूर्वी काढलेल्या विमान आणि पायलटच्या विम्यावर बोट ठेवून संशय आणखी बळकट केलाय... हे विमान कोणत्याही परिस्थितीत पाडायचंच, असं ठरवूनच या विमानात जास्तीचं इंधन भरलं होतं का? असाही प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलाय.. दुसरीकडे ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा विमान अपघात तपास संस्थेनं केलाय... या दाव्याचीही रोहित पवारांनी पोलखोल केलीय..

रोहित पवारांच्या दाव्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही या वादात उडी घेत संशयाचं धुकं आणखीच गडद केलंय.. अहमदाबाद विमान अपघात असो वा जगातील मोठे विमान अपघात झाल्यानंतरही ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतात. मग या अपघातात ब्लॅक बॉक्स जळालाच कसा? असा सवालच राजू शेट्टींनी उपस्थित केलाय.. रोहित पवार ज्या पद्धतीनं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करुन अनेक दावे करत आहेत.... अनेक शंका उपस्थित करुन वेगवेगळ्या संस्थांची पोलखोल करत आहेत.. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर आलंच पाहिजे.... असाच सूर देशभरातून उमटतोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Maharashtra Live News Update : यो यो हनी सिंगच्या पुण्यातल्या कॉन्सर्ट वर पावसाच सावट

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

SCROLL FOR NEXT