अजित पवार विमान अपघातावरून संशय अधिक गडद
अमोल मिटकरींची पायलटांच्या हालचालींचे CCTV जाहीर करण्याची मागणी
ऐनवेळी पायलट बदलल्यावर प्रश्नचिन्ह
अजित पवार याच्या विमान अपघातामागे घातपात असल्याचा संशय उपस्थित करणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा काही प्रश्न उपस्थित केलेत. ब्लॅक बॉक्सचं सत्य समोर येईल,पण अजितदादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते, ते घरातून कधी निघाले होते, याचा सीसीटीव्ही महाराष्ट्राच्या जनेते समोर आणा, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे.
आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावरून संशय व्यक्त केला आहे. अजितदादांच्या विमानाचे पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले. आधीचे पायलट कोणत्या ट्रॉफिकमध्ये अडकले होते, असा प्रश्न आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी उपस्थित केले आहेत. अजित पवार यांच्या विमानाचे जुने पायलट हे ट्रॅफिकमध्ये फसल्याने त्यांच्या जागी ऐनवेळी दुसरे पायलट देण्यात आले.
पण हे दोन पायलट, साहिल मदन आणि यश, हे घरातून कधी निघाले? ते कोणत्या गाडीतून बाहेर पडले? कोणत्या रोडवरील ट्रॅफिकमध्ये अडकले? मृत्यूमुखी पडलेले सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरातून कधी निघाले? या सगळ्याचे सीटीटीव्ही जाहीर करावेत, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. सगळ्या पायलटांचा दिनक्रम आणि २८ जानेवारी रोजीचे सर्व सीटीटीव्ही फुटेज महाराष्ट्राला कळू द्यावेत, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारकडे जुने दोन्ही पायलटच्या दिनचर्येचे सीसीटीव्ही फुटेज द्यावेत, अशी मागणी केली आहे.
अजित पवार यांचा अपघात झाला की घातपात याविषयी उलटसुलट चर्चा आहे. विमान अपघात कसा घडला याची माहिती ब्लॅक बॉक्समधून येऊ शकते, त्यामुळे त्या माहितीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. आता या ब्लॅक बॉक्सची तपासणी परदेशात होणार आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स जळाला आहे. त्यामुळे डीकोडिंगसाठी हा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवावा लागणार असल्याची माहिती मिळालीय. याबाबत सरकारकडून पुढच्या एक-दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान DGCAचा अपघातप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाहीये. हा अहवाल लवकरात लवकर द्यावा,अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.