Rupali Patil Thombare Vs Rupali Chakankar Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत वादाची ठिणगी! 'एकाच महिलेला किती पदे?' रुपाली पाटील संतापल्या; चाकणकरांना थेट विरोध

Maharashtra Politics Breaking News: रुपाली चाकणकर यांच्या नावाला पक्षातून विरोध दर्शवला असून एकाच महिलेला किती पदे? असा सवाल उपस्थित करत रुपाली ठोंबरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत अजित पवार यांना भेटणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Gangappa Pujari

Rupali Patil Thombare Vs Rupali Chakankar: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे, मुंबई उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र रुपाली चाकणकर यांच्या नावाला पक्षातून विरोध दर्शवला असून एकाच महिलेला किती पदे? असा सवाल उपस्थित करत रुपाली ठोंबरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत अजित पवार यांना भेटणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

एकाच महिलेला किती पदे?

'एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा.अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे,बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी, ही विनंती असेल," असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

रुपाली ठोंबरे संतापल्या...

"राज्यपाल नियुक्त आमदाराबाबत जे नावं चर्चेत आहेत, त्या बातम्या पेरण्यात आलेले आहेत. रुपाली चाकणकर यांच्याकडे आधीच महिला आयोगाचे अध्यक्ष पद आणि महिला प्रदेशाध्यक्ष अशी दोन पद आहे. एक व्यक्ती आणि एक पद असा निकष असला पाहिजे, मी पण अजितदादाची लाडकी बहीण आहे, त्यामुळे मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. रुपाली चाकणकर यांचे नाव. निश्चित झाल्यास त्याला आमचा विरोध असणार आहे. याबाबत मी अजितदादाशी प्रत्यक्ष भेटून बोलणार आहे," असेही त्या म्हणाल्यात.

चाकणकरांच्या नावाला विरोध करणार..

दरम्यान, "रूपाली चाकणकर यांनी काय केलं काय बोलल्या याच्याशी मला घेणं नाही. त्यांचा माझा बांधाला बांधला नाही. आम्ही आमची मागणी अजित दादांजवळ मांडली आहे, पक्षात इतरही महिला आहेत. आम्ही आधीपासून पक्षात काम करत आहे. काम करणाऱ्या महिलांना संधी मिळाली पाहिजे. किती वेळा अनेक पदे देणार? याचा विचार पक्षाने करावा. आम्हीही सामाजिक कार्य करतो. मग एकाच व्यक्तीला पदे देण्याचे कारण काय? आम्हाला त्या पटल्या तर मान्य करु, अन्यथा विरोध करु," असा थेट इशारा ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT