26 मेच्या रात्री दादांच्या राष्ट्रवादीत झालेली बैठक कमालीची वादळी ठरली...उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय़....अजितदादांच्या निधनानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि नेत्यांमधील मतभेद या बैठकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आलेत...या बैठकीत नेमकं काय घडलं? पाहूयात...
पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले...त्यामुळे बैठकीत पटेलांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं... "अजितदादांच्या निधनानंतर आम्हीच नेहमी टीकेचे धनी का व्हायचं? आमच्यावर सतत टीका होत असताना पक्षातील कुणीही आमच्या बाजूने खंबीरपणे उभं राहत नाही," अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. खासदार सुनील तटकरे आपले मुद्दे मांडत असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना मध्येच टोकल्यानं बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला. तसचं सुनील तटकरे यांनी आपले मत मांडायला सुरुवात करण्यापूर्वीच पार्थ पवार तडकाफडकी बैठकीतून निघून गेल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय...
दरम्यान राष्ट्रवादीच्या या बैठकीनंतर माध्यमांनी छगन भुजबळांना तटकरेंसोबतच्या वादाबद्दल प्रश्न विचारला. असता भुजबळांनी अस काही घडलं असल्याचं पूर्णपणे फेटाळून लावलं...तर दुसरीकडे पेल्यातलं वादळ पेल्यात शमलं...असं सांगत मुश्रीफांनी बैठकीत वाद झाल्याच्या चर्चेवर एकापरीने शिक्कामोर्तब केलं....
गेल्या काही दिवसात दादांच्या राष्ट्रवादीत कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याची चर्चा रंगली होती... त्यात सुनेत्रा पवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावल्यानं पक्षातील अंतर्गत वाद शमेल,अशी शक्यता होती...मात्र याचं बैठकीत पटेलाचं गैरहजर राहणं आणि तटकरे- भुजबळांमधील वाद यामुळे पक्षातील धुसफूस वाढत असल्याची चिन्ह आहेत....याआधीही निवडणुक आयोगाला दिलेल्या पत्रातून नावासमोरील पदांचा उल्लेख नसल्यानं पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती... अशातच आता सुनेत्रा पवार पक्षातील अंतर्गत वादावर पडदा कसा पाडणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.