Ajit Pawar - Sharad Pawar News  Saam TV
महाराष्ट्र

Beed News: शरद पवारांच्या आरोपांना अजित पवार प्रत्युत्तर देणार? बीडमधील उत्तर सभेकडे लागलं साऱ्यांचं लक्ष...

Ajit Pawar: शरद पवारांच्या आरोपांना अजित पवार प्रत्युत्तर देणार? बीडमधील उत्तर सभेकडे लागलं साऱ्यांचं लक्ष...

विनोद जिरे

Beed News: राष्ट्रवादीच्या उभ्या फुटीनंतर राज्याचे राजकारण आता तापलं आहे. अशातच या तापलेल्या राजकारणात बीडमधून राज्याच्या नव्या राजकारणाला सुरुवात होते की काय, असं वाटतंय? गुरुवारच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये स्वाभिमान जाहीर सभा पार पडलीय. आता या सभेला उत्तर देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड शहरात जाहीर सभा होत आहे.

बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर 27 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता ही जाहीर सभा होणार आहे. आज अजित पवार गटाचे नेते वाल्मीक कराड यांच्यासह बीड मतदारसंघाचे नेते बळीराम गवते यांनी या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाची पाहणी केलीय.

दरम्यान, आता या होणाऱ्या 27 तारखेच्या सभेतून शरद पवार यांच्या सभेला अजित पवार काय उत्तर देणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, बीडमधील सभेत शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. या सभेत बोल;ताण ते म्हणाले होते की, 'हे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. आता चुकीच्या लोकांना आवरण्याची वेळ आली आहे.' ते म्हणाले, 'संपूर्ण जिल्ह्यात ठीकठिकाणी तुमचा उत्साह पाहिल्यावर मला जुन्या काळाची आठवण झाली. त्याकाळात या जिल्ह्याचं नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं आता त्यांच्या नातूकडे आहे. केशरकाकूंनी जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांच्या नातवांनी घेतली.'

देशातील महागाईवर लक्ष केंद्रीत करत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले होते की, 'आज महागाईचा प्रश्न आहे. पेट्रोल- डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आज पाऊस, पाणी नाही. खतांच्या किंमती वाढल्या आहेत. आज शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT