Ajit Pawar 
महाराष्ट्र

यापुढं उदघाटनास मला बाेलवताना ५० वेळा विचार करा : अजित पवार

ओंकार कदम

सातारा : वडूज येथील बांधण्यात आलेले पाेलिस स्टेशनचे काम दर्जा निकृष्ट असल्याचा दाखला खूद्द उदघाटक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यासपीठावरुनच दिल्याने उपस्थितांची भांबेरी उडाली. दरम्यान उपमुख्यमंत्री पवार Ajit Pawar यांनी उदघाटनाच्या कार्यक्रमांना मला बाेलवताना ५० विचार करुन बाेलवत जा अन्यथा तुमचा पंचनामा हाेईल असा इशारा प्रशासनास दिला.

साताऱ्यातील खटाव तालुक्यात वडूज येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलिस स्टेशनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी झालेले. परंतु या इमारतीच्या दर्जाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आलेल्या पोलिस स्टेशनचा उद्घाटनास मला बोलावले. यापुढं अधिकाऱ्यांनी ५० वेळा विचार करून मगच मला बोलवा अन्यथा तुमच्या कामाचा पंचनामा होईल आणि तुमची बदनामी होईल अशा कडक शब्दात त्यांनी पोलिसांना सुनावले.

यावेळी व्यासपीठावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे, आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य प्रभाकर देशमुख, सुनील माने आदी उपस्थित होते. या मान्यवरांसमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावल्याने अधिका-यांची भांबेरी उडाली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणेशोत्सवामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या तारखांचा पुनर्विचार करावा- केसरकर

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

राजकीय भूकंप होणार! सत्ताधारी भाजपमधील अनेक नेते पक्षाला ठोकणार 'रामराम'; बड्या नेत्याच्या काँग्रेस प्रवेशानंतर चर्चांना उधाण

15 सप्टेंबरला जरांगे अंतरवालीतून निघणार, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर धडकणार

Crime: मुलावर जादुटोणा केल्याचा संशय, सासऱ्याने सुनेला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT