मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राजकीय नेत्यांना विविध ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिवसभर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनाही मराठा समाजाकडून विरोध होताना दिसत आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. जगदीश कदम यांची उपस्थिती राहणार आहे. मात्र या संमेलनाला अजित पवारांनी येऊ नये म्हणून सकल मराठा समाजाने आवाहन केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे या संमलेनाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार हे सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने दाखल होतील. त्यानंतर ते दोन ठिकाणी खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीनच्या सुमारास संभाजीनगर जिल्ह्याची आढाव बैठक घेणार आहेत.
आमचा साहित्य संमेलनास विरोध नसून त्याठिकाणी संमेलनाच्या आडून काही राजकीय मंडळी स्वतःचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना शासनाने अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने संविधानिक पदावर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी जनतेत येऊ नये, अशी आमची भूमिका असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून म्हणले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.