Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar in Beed : बीडच्या शेतकरी पुत्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना सभेआधी 6 प्रश्न, अख्ख्या बीडमध्ये बॅनरची चर्चा

Beed Farmer Banner : छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरच्या माध्यमातून हे 6 प्रश्न विचारले आहेत.

विनोद जिरे

Beed News :

राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्राने अजित पवारांसमोर 6 प्रश्न उपस्थित केलेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरच्या माध्यमातून हे 6 प्रश्न विचारले आहेत. सध्या हे बॅनर चर्चेचा विषय बनले आहे.

शेतकरी पुत्राने काय प्रश्न विचारले?

  1. बारामतीप्रमाणे बीड जिल्हा जलसमृद्ध कधी होणार?

  2. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा मिळाला, आमच्या शेतकऱ्यांना कधी ?

  3. गेल्या वर्षीचे अनुदान वाटप कधी?

  4. जिल्ह्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एखादे विद्यापीठ कधी ?

  5. कामगारांना प्रमाणपत्र आणि पाल्यांना शिष्यवृत्ती कधी ?

  6. बारामतीचे रस्ते चकाचक झाले बीडचे खड्डे भरणार कधी ?

अजित पवारांचा लोकप्रतिनिधींशी चर्चा

बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व महावितरण कडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. (Latest Marathi News)

 बीड जिल्ह्यात येत्या रविवारी होत असलेल्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी याआधीही सांगितले होते. त्याला अनुसरून मंत्रालयात बीड जिल्ह्यातील विकास कामांच्या संदर्भात विविध बैठकांचे सत्र सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast Cancer Risk : झोपेची कमतरता, ताण आणि मांसाहारामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, ICMR चा धक्कादायक अहवाल समोर

Maharashtra News Live Update: शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचाही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार

Health Tips : भटक्या कुत्रा चावला? वेळ वाया घालवू नका; हे उपाय तातडीने करा

Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला

Currency note serial number: नोटांवरचा सिरीयल नंबर नेमका काय सांगतो? जाणून घ्या रहस्य

SCROLL FOR NEXT