MLA Gopichand Padalkar Opposes Ajit Pawar 
महाराष्ट्र

Ajit Pawar: धनगरांच्या कार्यक्रमाला अजित पवारांना नो एन्ट्री; भाजप आमदाराचा दादांना विरोध

MLA Gopichand Padalkar Opposes Ajit Pawar: महायुती सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. मात्र भाजपच्या आमदारालाच दादा नकोसे झालेत. मात्र हा आमदार कोण आहे? आणि त्यांना अजित पवार का नकोसे झालेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात पवार विरुद्ध पडळकर संघर्ष काही केल्या संपतांना दिसत नाही. आता निमित्त ठरलं ते ३१ मे रोजी होणाऱ्या आहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीदिनाचं. पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 300 व्या जयंतीनिमित्त तब्बल 50 हजार धनगरी ढोल वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत.

तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झाडून सगळया मंत्र्यांना बोलावणं गेलय मात्र या कार्यक्रमाला अजित पवारांना बोलावणार नाही अशी भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतलीये. आणि इथेच नव्या वादाला तोंड फुटलंय. हा कार्यक्रम धनगरांचा असून धनगरांनी ठरवलेला आहे. हा कार्यक्रम शासकीय नाही. त्यामुळे अजित पवारांना बोलवणार नाही असं बोलून पडळकरांनी अजित पवारांविरोधातील हत्यार अजून म्यान केलेली नाही असं स्पष्ट केलंय.

पडळकरांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची गोची झाली. यावर आता राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलयं. पवारांना विरोध करुन राजकीय भूमिका मांडणाऱ्या न पुढाऱ्यांमध्ये गोपिचंद पडळकरांचं नाव प्रामुख्यानं येतं. आता तर ज्या कार्यक्रमाला अमित शहांना बोलावलं जातंय तिथे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलावणार नाही ही परखड भूमिका पडळकरांनी घेतल्यानं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान तोही भाजपच्या आमदाराकडूनच. म्हणून आता भाजप यावर काय भुमिका घेतय याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT