Pawar family members raise serious questions and demand a transparent investigation into Ajit Pawar’s death Saam Tv
महाराष्ट्र

दादांच्या घातपातावर सर्व पवारांचं एकमत, रोहित पवारांपाठोपाठ सुळेंनाही संशय

Ajit Pawar Plane Crash Accident Or Foul Play Full Controversy: अजित पवारांचा अपघात की घातपात...? यावर संपूर्ण पवार कुटुंबाचं एकमत झालंय... त्यामुळे दादांच्या मृत्यूबद्दल संशय आणखीच वाढलाय... दादांच्या मृत्यूबद्दल पवार कुटुबातून कोणी काय संशय व्यक्त केलाय...

Bharat Mohalkar

अजित पवारांच्या मृत्यूनंतर दादांचा अपघात की घातपात याची चर्चा सुरु झाली.. त्यातच रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करत अनेक प्रश्न उपस्थित केले... मात्र आता फक्त रोहित पवारच नाही तर अजितदादांच्या घातपाताबद्दल सर्वच पवारांचं एकमत झाल्याचं समोर आलंय.दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी करत व्हीएसआर कंपनीची उड्डाणं तात्काळ रद्द करण्याची मागणी जय पवारांनी केलीय..

जय पवारांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचं संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे.. VSR ला तात्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालावी आणि VSR च्या संभाव्य गैरव्यवहाराची सखोल चौकशी कऱण्याची मागणी जय पवारांनी केलीय.. दुसरीकडे रोहित पवार उपस्थित करत असलेल्या मुद्द्यांची उत्तरं मिळत नसल्यानं महाराष्ट्राच्या मनात संशयाचं धुकं गडद होत असल्याचं सुळेंनी म्हटलंय..

एका बाजूला रोहित पवार तथ्यांसह उपस्थित करत असलेले मुद्दे तर दुसरीकडे सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवारांच्या मनातील संशयामुळेच त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलीय.. त्यामुळे पवार कुटुंबासह महाराष्ट्रातील जनतेच्या मनात वाढत चाललेलं संशयाचं धुकं आणखी गडद होण्याऐवजी सरकारने त्रयस्थ संस्थेमार्फत सखोल चौकशी करुन सत्य समोर आणायला हवं....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Viral Video: स्टंटगिरी आली जिवाशी! किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकाला भल्या मोठ्या लाटनं खोल समुद्रात ओढलं, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Maharashtra Politics: पुन्हा राज्यात भूकंप होणार? मविआच्या बैठकीत २३ आमदारांची दांडी, ठाकरेंचा काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट सवाल

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT