Winter Assembly Session Saam Tv
महाराष्ट्र

Winter Assembly Session: राम शिंदे हरले, गिरीश महाजन मंत्री झाले? अधिवेशनात अजित पवारांची फटकेबाजी

Ajit Pawar In Vidhan Parishad: अजित पवार यांनी राम शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. यामुळे सभागृहात मोठा हश्या पिकला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजप आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. भाषण करताना राम शिंदेंना पराभव कसा फायद्याचा ठरला आणि त्यामुळे गिरीश महाजनांनाही कशी मंत्रिपदाची लॉटरी लागली हे अजितदादांनी सांगत जोरदार फटकेबाजी केलीये...कशी पाहूया..

महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरुए.तरी खातेवाटप अद्याप झालेलं नाही. दुसरीकडे विधानपरिषदेमध्ये सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजप आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. भाषण करताना राम शिंदेंना पराभव कसा फायद्याचा ठरला आणि त्यामुळे गिरीश महाजनांनाही कशी मंत्रिपदाची लॉटरी लागली असं सांगताना अजितदादांनी जोरदार फटकेबाजी केली.

राम शिंदे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उभे होते. रोहित पवारांनी त्यांचा 1100 मतांनी पराभव केला. अजित पवारांनी सभा न घेतल्यामुळेच पराभव झाल्याचा आरोप राम शिंदेंनी केला होता. त्यामुळे महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला होता. मात्र हा पराभव सर्वांसाठी कशी संधी म्हणून कामाला आला असं अजितदादांनी सांगितलं असलं तरी सभापती पदावर वर्णी लागल्यामुळे राम शिंदें हा पराभव विसरणार की त्याचा भविष्यात वचपा काढणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच आंदोलन

Oral Medicines: सरकारचा नवा नियम; आता मेडिकलमधून कोणालाही मिळणार नाहीत ही औषधं, जाणून घ्या कारण

Sairat 2: 'सैराट २' येणार का? नागराज मंजुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, 'चांगली कथा असेल तरच...'

ITR Update : वेळेत आयटीआर भरला तरीही रिफंड अडकू शकतो; एका चुकीमुळे भरावा लागेल दंड

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला

SCROLL FOR NEXT