Amol Mitkari’s statement rekindles the debate on Ajit Pawar’s chances of becoming Maharashtra’s next Chief Minister. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीच्या द्विवर्षपुर्तीआधी अजितपर्व येणार? दादांचं मुख्यमंत्रिपदासाठी बाशिंग?

Political Equations Shift: महायुतीच्या वर्षपुर्तीच्या दिवशीच अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगलीय.. मात्र त्याचं कारण काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी नेमके काय संकेत दिले होते.. आणि त्यावरुन शिंदेसेनेनं काय उत्तर दिलंय..

Bharat Mohalkar

ऐकलंत... देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वर्षपुर्तीच्या दिवशीच अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा रंगल्या आहेत... आणि त्याला कारण ठरलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य....महायुती सरकारच्या द्विवर्षपुर्तीआधी अजितपर्व येणार असल्याचं मिटकरींनी म्हटलंय... तर अजित पवार वर्षभरात रुसुन कधी बारामतीला गेले नाहीत, असा खोचक टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावलाय...

मिटकरींच्या वक्तव्यानंतर शिंदेसेनेनं सावध प्रतिक्रिया दिलीय.. खरंतर मुख्यमंत्रिपदाबाबतची अजित पवारांची इच्छा काही लपून राहिलेली नाही... तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंही मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे.... मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेतील मतभेद टोकाला गेलेत.त्यामुळे राजकीय समीकरणं बदलली आणि मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरु झाल्यास अजित पवारांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार की अजित पवारांच्या नावावरचा उपमुख्यमंत्रिपदाचा विक्रम कायम राहणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुरक्षारक्षकांचा आवाज उठवल्यानं गुन्हा दाखल; पवई हिरानंदानी परिसरातील देशमुखांच्या 'त्या' राड्यावर पत्नीचा मोठा खुलासा

इंडिगोची धडाधड उड्डाणं रद्द; कधीपर्यंत पूर्ववत होईल इंडिगोची सेवा,सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

शिक्षकांचा एल्गार, 80 हजार शाळांना कुलूप, शिक्षकांनी का पुकारला बंद?

वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेसेना–भाजप राडा! कामगार युनियनवरून वाद चिघळला

अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

SCROLL FOR NEXT