नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात
वाशी, खारघर, बेलापूर इत्यादी पाऊस मुसळधार
क्षणभर विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात
इस्त्रायलने तेहरानमधील लवीजान शहरावर हल्ले केले आहेत. याच भागात इराणचे मोठे कारखाने आणि बंकर आहे. इराणचे वरिष्ठ नेते अयातुल्ला अली खेमेनेई यांचे बंकर आहे.
वसई-विरार शहरात संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला
विरार पश्चिमेकडील पुष्पनगर बस डेपो मार्ग पाण्याखाली
कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातून करावा लागतो प्रवास
अनेक वाहने रस्त्यातच पडली बंद
महाराष्ट्र सरकारने पहिली ते पाचवीच्या वर्गांमध्ये हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या मुलुंड विभागातर्फे आज, बुधवारी संध्याकाळी मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर मूक निदर्शने करण्यात आली. सत्यवान दळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भर पावसात हे आंदोलन केले. मनसैनिकांच्या हातात 'हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? ', 'दक्षिणेत हिंदी सक्ती कराल का?' अशा आशयाचे फलक होते. "मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असून तिचा अवमान करणारा कोणताही निर्णय आम्ही सहन करणार नाही. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला गेला नाही, तर मनसे तीव्र आंदोलन करेल," असा इशाराही मनसेने दिला.
ठाण्यात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. शहरात संध्याकाळच्या सुमारासही पावसाने हजेरी लावली. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शाळांमध्ये हिंदी ही तृतीया भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या निर्णयावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावरून राज्य सरकारला इशाराही दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकारनं याबाबत एक पत्रकार परिषद घ्यावी आणि या धोरणासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं अशी माझी विनंती आहे, असं त्या म्हणाल्या
पैठणवरून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे सूर्यास्तापूर्वी प्रस्थान झाले. या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
अंधेरी वर्सोवा भागात 11 तास पाणी पुरवठा बंद
अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा येथील पाईपलाईनवर व्हॉल्व्ह बदलणे आणि दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा राहणार बंद
गुरुवारी दुपारी दोन ते शुक्रवारी पहाटे एक वाजेपर्यंत असा एकूण 11 तास पाणीपुरवठा राहणार बंद
पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा महापालिकेच्या के पश्चिम विभागाचा सल्ला
के-पश्चिम वॉर्ड मधील अंधेरी, जुहू, विलेपार्ले - पश्चिम, जुहू, चार बंगला सात बंगला लोखंडवाला जोगेश्वरी शास्त्रीनगर भागात पाणीपुरवठा प्रभावित होणार
एफ.सी. रोडवर असलेल्या अनेक अनधिकृत दुकानांमुळे नागरिकांना चालण्यास जागा मिळत नव्हती. अनेकांनी याबाबत पोलीस आणि महापालिकेला तक्रार दिली होती. आज पुणे पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत अनधिकृत दुकानं पाडली.
नवी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालीय. खारघर, वाशी, बेलापूर, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन सज्ज केले आहे.
गेल्या एक तासांपासून नंदुरबार शहरात पाऊस चालू आहे. तासभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलंय. नालेसफाई न झाल्याने नाल्यातील पाणी रस्त्यांवर आले आहे.
विसरवाडीहून नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या 108 रुग्णवाहिकेचा अपघात
भादवड गावानजीक असलेल्या एका दुकानाला रुग्णवाहिका धडकली.
भरधाव रुग्णवाहिका दुकानात शिरल्याने गरीब कुटुंबीयांचं मोठं नुकसान झाले आहे.
रुग्णवाहिकेचा अपघातात कोणतीच जीवित हानी झाली नाही.
शासन शुद्धीपत्रक काढून महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतलाय,शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची हा शासन निर्णय रद्द करणेबाबत आज उल्हासनगरच्या उपविभागी कार्यालया बाहेर या शासन निर्णयाची मनसे कडून होळी करण्यात आली. तसेच उल्हासनगर उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले,"महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत हिंदी भाषा लादू दिली जाणार नाही. त्रिभाषा सूत्राचा राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी काहीही संबंध नसून हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. हा शासन निर्णय तात्काळ रद्द न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्र भर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा मनसे चे जिल्हाप्रमुख यांनी दिला.
सांगलीच्या मिरजेत गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. मिरज शहरातल्या चर्चजवळ हा प्रकार झाला, दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली. यावेळी सलून दुकानाची देखील तोडफोड करण्यात आली. या हाणामारी दरम्यान हवेत गोळीबार करण्याचा देखील प्रकार घडला आहे. वर्चस्व वादातून हा प्रकार घडण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र नेमका हा गोळीबार आणि घटना कोणत्या कारणातून घडली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. या घटनेनंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार यंदाचा शिवराज्यभूषण पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळ्याला खासदार छत्रपती शाहू महाराज आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित
डॉ.जयसिंग पवार आणि आ. ह साळुंखे यांना यंदाचा शिवराज्यभूषण पुरस्कार
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी मुख्य प्रवेशद्वारावर येणार
आजचा पालखीचा मुक्काम देहूमध्येच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळच पडला ड्रोन
मुख्य प्रवेशद्वाराजवळ पडलेला ड्रोन पोलिसांनी केला जप्त
सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही.
पिंपरी चिंचवड -
देहू - आळंदी रोडवर क्रेन चालकाने दिली वारकऱ्याला धडक
धडकेत वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव -
सुधाकर बडगुजर भाजप प्रवेश भाजपा आता पवित्र झाली - एकनाथराव खडसे
सुधाकर बडगुजर दाऊद हसत यांच्यासोबतचे फोटो प्रकाशित झाले
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध ही केला व विधानसभेत ही मांडणी केली व मोठ्या प्रमाणात आदळ आपट केली
आता सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केला आहे आता भाजपा पवित्र झालेली आहे
नाथाभाऊला प्रवेश देताना नाथाभाऊवर आक्षेप आहे म्हणून नाथाभाऊंना प्रवेश दिला गेला नाही
त्यावेळेस भाजपा अपवित्र होत होती आता या सर्वांना प्रवेश देऊन भाजपा पवित्र होत आहे एकनाथ खडसे यांचा आरोप
शॉक लागून तीन गायींचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या येवला शहरातील पारगाव रस्त्यावर घडली. या ठिकाणी भूयारी गटाराचे काम सुरू आहे. तेथील विजेच्या खांबावरील तारा वाऱ्यामुळे रस्त्यावर तुटून पडल्या. वीजप्रवाह रस्त्यावर उतरला होता. तेथून जाणाऱ्या तीन गायींना शॉक लागला. त्यात त्या दगावल्या.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी
राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी
खानीवडे ते कुडे दरम्यान आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग
महामार्ग पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, वाहनचालक त्रस्त
सरकारकडून वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आषाढी वारीतील ९०२ दिंडीस प्रत्येकी २०, ००० रुपये असे एकूण १,८०, ४०, ००० रु.उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाने तात्काळ निधी सुपूर्द करण्याची कार्यवाही पूर्ण झाली. आज किंवा उद्या तो निधी खात्यात थेट वर्ग होईल. उर्वरित दिंडीची माहिती घेणे प्रारंभ.
दीडशेहून अधिक घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे
सलग पाच दिवस शंभरहून अधिक सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी ही कारवाई केली आहे
आरोपीकडून तीन लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
शहर आणि परिसरात 150 हून अधिक घरफोड्या केल्या आहेत.
कोंढवा परिसरात चार जून रोजी चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातून २१ तोळे सोने, रोकड आणि सोसायटीतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता.
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली.
हिंदी भाषा सक्तिविरोधात मनसेने आंदोलन केले आहे. हिंदीचे पुस्तक फाडून त्यांनी विरोध दर्शवला आहे.
यात पाच ते सहा पोलिसांच्या पिंजरा गाड्या, एक महामंडळाची बस एक टेम्पो, एक पोलिस स्कॉर्पिओ,जीप असा गाड्यांचा समावेश आहे या सर्व गाड्या एकावर एक आदळून झाला हा अपघात.
पुणे लेन वर झाला हा अपघात.
मुंबई वरून पुण्याकडे बांगला देशी कैद्यांना घेऊन जाणारा हा ताफा होता.
या अपघातात कोणीही कैदी जखमी झाले नाही पण गाड्या चालवणारे दहा ते बारा पोलिस चालक मात्र जखमी झाले आहेत. त्यांना पनवेल च्या एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुपारी २.३० वाजता पालखी सोहळ्याला होणार सुरुवात
हजारोंच्या संख्येने वैष्णवांचा मेळा देहू मंदिरात पोहचला
हातात झेंडा पताका, टाळ, मृदुंगाच्या निनादात देहू नगरी न्हाऊन गेली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २ वाजता देहू मंदिरात येणार
फडणवीस घेणार तुकोबा राया यांच्या पादुकांचे दर्शन
पांडुरंग आमच्या पाठीशी आहे. लवकरच दादाला पांडुरंगाची इच्छा असल तेव्हा पूजा करण्याची संधी मिळेल
आज मी दर्शनासाठी आलो आहे प्रथमच देहुमध्ये आलोय. दरवर्षी मी वारीमध्ये असतो.
राज्याचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या
पवार साहेबांच्या आमदारांची आणि खासदारांची इच्छा होते की एकत्र यावं
पवार साहेबांची इच्छा नसल तर एकत्र येणार नाही .पांडुरंग आमच्या पाठीशी आहे.
कोरोणा बाबत आम्ही सतर्कता ठेवली आहे. वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली आहे. कोरोनाचा सावट असलं तरी घाबरण्याचं कारण नाही. कोरोनाला लोक धाडसाने सामोरे जातात. कोणाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.
सर्वांना सुखी ठेव पाऊस चांगला पडू दे पावसामुळे नुकसान होऊ नये सर्व लोक आनंदात राहावेत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीतून मी पुण्य झालो आहे
-
- काल रात्रीचा सुमारास पुलाचं काम करणाऱ्या जेसीबीने पाण्याची मुख्य लाईन फुटल्याची माहिती
- त्यामुळे हसनबाग आणि नंदनवन झोपडपट्टीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई...
- मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी गेले वाया
- महानगरपालिका, ओडब्ल्यूसीला पूल कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी
घाटाखाली असणाऱ्या पेढे गावाला धोका कायम
मुंबई गोवा महामार्गाच्या सिमेंट रोड खालील मातिची धूप
महाराष्ट्रातील प्रत्येकाने हिंदी सक्तीच्या आदेशाला विरोध करायला हवा. शाळेत हिंदी कसं शिकवात, हेच बघूयात. सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते आव्हानच समजावे. मोदी केंद्रात असताना गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही. मग महाराष्ट्रातच हे धोरण का राबवले जातेय. याला सर्वांनी विरोध दर्शवला पाहिजे.
महाराष्ट्र सरकारने शाळेत हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत दोन पत्रकं सरकारला पाठवली आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती सक्तीची करून देणार नाही. राज्याचे शैक्षणिक धोरण महत्त्वाचा विषय आहे. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली तर मनसे खपवून घेणार नाही. - राज ठाकरे
. मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक ठप्प . पालघरच्या सातीवली जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा . पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातीवली जवळ उड्डाण पुलाच काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी . महामार्गावरील उड्डाण पुलाच काम मागील अनेक महिन्यांपासून रखडलं . ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा वाहन चालक , प्रवासी आणि स्थानिकांना फटका . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यात महामार्ग पोलिसांना अपयश
देहू मध्ये मंदिरात जाऊन अजित पवारांनी घेतलं दर्शन
अजित पवार यांनी घेतला पालखी सोहळा आढावा
० माणगावच्या प्रांताधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना
० आदेशांचे पालन करीतच पर्यटनाचा आनंद लुटता येणार
रायगडच्या माणगाव तालुक्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या अतिउत्साहाच्या भरात होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेवून माणगावचे प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी हे आदेश जारी केले आहेत. देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हाणी घाट परीसरात पावसाळी पर्यटन करताना पर्यटकांनी काय करू नये याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धबधब्यांच्या परीसरात दारू पिणे, दारू बाळगणे याला प्रतिबंध करण्यात आलाय तर धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे, चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परीणाम करणारे चित्रीकरण करणे, रील्स बनवणे यावरदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे.
पैसा क्षेत्र बाहेर ग्रामपंचायत पदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.....
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 76 ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्राबाहेल असल्याचा स्पष्ट....
ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी नवीन पद्धतीने आरक्षण निश्चित करण्याचे आदेश.....
सरपंच पदासाठी आता पाच वर्षांसाठी आरक्षण निश्चित....
नंदुरबार जिल्ह्यात खुल्या प्रवर्गासाठी सर्वाधिक 50 जागांवर असणार प्रतिनिधित्व...
25 ग्रामपंचायतींवर असणार महिलाराज....
हार्बर लाइनवरील वाहतून उशिराने सुरु आहे. काही कारणांमुळे रेल्वे उशिराने धावत आहेत.
"ज्ञानोबा माऊली... तुकाराम!" चा गजर करत, भक्तिरसात न्हालेली असंख्य दिंड्या आज आळंदीत इंद्रायणी घाटावर दाखल झाल्यात.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी इंद्रायणी घाटावर एकत्र येत टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीचा जल्लोष इंद्रायणी काठी सुरूय यंदा पावसाने दिलासा दिल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामं उरकून आता मनोभावे वारीला हजेरी लावलीय.शेती,व्यवसायाची कामं उरकली, आता विठ्ठल भेटीची ओढ” अशा भावना व्यक्त करत वारकरी संपूर्ण तनमनाने पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी सज्ज झालेत
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक उधळून लावली आहे. शहादा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पदकाने संयुक्त पथकाने ही कारवाई करत सुमारे 25 लाख रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू व संबंधित वाहन जप्त केले आहे.
काँग्रेस मध्ये अनेक पदाधिकारी पद घेऊन बसले, निवडणूका आल्या कि पक्षाविरोधात ते काम करतात, काहींना भाजपचा तर काहींना शिवसेनेचा पुळका आला असून त्यांना पदमुक्त करा अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यवतमाळमध्ये केली. काँग्रेसने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्यांनी
पक्षात गटबाजी करणाऱ्यांचा समाचार घेतला.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इतर पक्षाचे उमेदवार निश्चित होऊन ते कामाला देखील लागलेत मात्र काँग्रेस मध्ये वेळेपर्यंत उमेदवार ठरत नाही. परिणामी त्याचा फटका काँग्रेसला बसतो अशीही तक्रार खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
20 दिवसात 9 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह...
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 10 मध्ये कोरोना वार्ड तयार..
शहरातील दोन सक्रिय रुग्ण घेत आहेत खाजगी रुग्णालयात उपचार..
वाढत्या कोरोनाच्या रुंगाच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण......
सर्दी,ताप,खोकला आल्यास नागरिकांनी तात्काळ तपासणी करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना
उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन
प्रस्थान सोहळ्यापूर्वी अजित पवार यांच्याकडून पालखी सोहळ्याचा आढावा
दर्शन आणि आढावा घेऊन अजित पवार बारामतीला जाणार
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याप्रकरणी लय भारी यूट्यूब चैनल चे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी विविध गुन्ह्यामध्ये अटक केली होती या प्रकरणात 102 दिवसांच्या कारावासानंतर पत्रकार तुषार खरात यांची वडूज सत्र न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे.
ॲट्रॉसिटी, विनयभंग,खंडणी अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अटक केली होती. कारागृहामध्ये असताना त्यांनी अन्न त्याग आंदोलन देखील केले होते..
देहू नगरीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्या निमित्त सकाळपासून हजारोंच्या संख्येने भाविक येत आहेत. मुख्य मंदिरात जाऊन पालखी सोहळा अनुभवण्यासाठी पहाटेपासून मोठी गर्दी पाहायला मिळते. छान वाटतंय, पेरण्या झाल्या आहेत विठुरायाने सगळ्यांना सुखी ठेवावं हेच साकडं आहे अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केलीय. दुपारी होणाऱ्या प्रस्थान सोहळ्याला सकाळपासून च देहू नगरीत वैष्णवांचा मेळा आलेला पहायला मिळाला. याठिकाणी रांगेत थांबलेल्या भाविकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...
महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकार्याने दिली फिर्याद
राज्य महिला आयोगाने देखील घेतली होती पुणे महानगरपालिकेतल्या या प्रकरणाची दखल
समिती स्थापत चौकशी करण्याचे महिला आयोगाने दिले होते आदेश
या प्रकरणानंतर ओंकार कदम याला पुणे महानगरपालिकेत बंदी देखील घालण्यात आली होती
आज अखेर त्याच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करीत असताना पुन्हा खड्डयांचा त्रास सहन करवा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गाचे बऱ्याचअंशी काँक्रिटीकरण पुर्ण झाले असले तरी माणगाव, रोहा आणि पेण परिसरात उड्डाण पुलांची काम अपूर्ण आहेत. यादरम्यान तयार केलेल्या सर्व्हिस रोडची पावसाचे पाणी साचुन पार दुरावास्था झाली आहे. गडब, नागोठणे आणि लोणेरे येथील या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले असून यातुन मार्ग काढताना वाहन चलकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्याव अशी मागणी केली जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण जोडी 27 गावांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे . एकीकडे 27 गाव संघर्ष समितीकडून या 27 गावांचे स्वतंत्र नगरपालिका करण्याचे मागनी पुन्हा एकदा केली जाते तर दुसरीकडे 27 गावे केडीएमसीतच राहावीत यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे संदीप पाटील यांनी 27 गावे आता निघणार नाहीत असे मत ठामपणे व्यक्त केलंय . त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचा निवडणुका या 27 गावासहहोतात की 27 गाव वगळून होतात याकडे आता सर्वांचेच जास्त लक्ष लागलंय
15 जून रोज रविवारी सकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी केदारनाथ इथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या वणीतील व्यावसायिक राजकुमार जयस्वाल,पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि दोन वर्षाची चिमुरडी काशी या तिघाचा झाला होता अपघातात दुर्दैवी मृत्यू
वणीच्या नांदेपेरा मार्गावर असलेल्या राजकुमार जयस्वाल यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार
रात्री डीएनए चाचणीनंतर तिघांचेही पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन,दिल्ली वरून विशेष विमानाने नागपूर आणि नंतर वणी येथे आणण्यात आले तिघांचे पार्थिव,काही वेळात होणार तिघांवर अंत्यसंस्कार, तिघांच्या पार्थिववर सकाळी नऊ वाजता मोक्षधामात होणार अंत्यसंस्कार
जळगाव जिल्ह्यातील दोन दिवसांपासून विविध प्रकल्प पाणलोट क्षेत्रात सरासरी ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हतनूरमध्ये १.५० दशलक्ष घनमीटर, तर गिरणात ०.१७ दशलक्ष घनमीटर पाण्याची प्रथमच आवक झाली आहे. पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांचे दरवाजे बंद करण्यात आल्याचे जिल्हा सांगण्यात आले. प्रशासनातर्फे गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले चांगले प्रवाहित होते. मोठ्या प्रकल्पांमधून कालवा समितीने निर्धारित केल्यानुसार वेळोवेळी सिंचन व पेयजलाचे आवर्तन सोडले होते. यंदाच्या उन्हाळ्यात अतितापमान व बाष्पीभवनामुळे तीन मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के, तर तीन प्रकल्पांची मृत साठ्याकडे वाटचाल सुरू आहे. सद्यःस्थितीत २१ गावांना २५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ४६ गावांसाठी ११ विहिरीचे अधिग्रहण केले आहे.
वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या 68 हजार 656 हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली असून, याची टक्केवारी 16.86 टक्क्यावर पोहोचली आहे.
वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सरासरी 4 लाख 7 हजार 256 हेक्टरवर खरिपाची पेरणी होते. मे महिन्यात अवकाळी पाऊस त्यानंतर जून महिन्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र मागील दोन दिवसात पावसाने उसंत घेतल्याने पेरणीला शेतकऱ्यांनी थोडासा ब्रेक घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. युतीसंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष लागलेय. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकारणात बरीच चर्चा रंगली होती. त्यामुळे राज ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठऱणार आहे.
कुंडमळा दुर्घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय
पुणे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी पर्यटकांना प्रवेश शुल्क द्यावे लागणार असल्याची शक्यता
प्रवेशाबाबतचे स्वतंत्र पर्यटन धोरण लवकरच जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्याचा निर्णय घेणार
पर्यटनस्थळांवर किती अंतरापर्यंत पर्यटकांना जाऊ देण्याची मुभा असावी इथपासून ते सुरक्षिततेच्या विविध उपाययोजनांचा समावेश असणार आहे
वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 1 ते 8 वी पर्यंतच्या सर्व 1 लाख 11 हजार 865 विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके मिळणार आहेत, त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळेत धडे गिरवायला सुरुवात होणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी 6 लाख 64 हजार 724 पुस्तके शाळेत पोहोचली आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद शाळेची घंटा 23 जूनला वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाशिमच्या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाने चांगली तयारी केली असून, या सर्व पुस्तकाचे वाटप शाळांना करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेची घंटा वाजताच अध्यायनाला सुरुवात होणार आहे.
मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी खाली येण्याचे प्रमाण वाढलेय.संगमेश्वर संगमेश्वरमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालीय. कुचांबे येथे घरावर दरड कोसळलीय. मोठ्या भेगा देखील पडल्यात.त्यामुळे दरड पुन्हा केंव्हाही कोसळण्याची भिती निर्माण झाली. दरड कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.या दरडीमुळे इथल्या घरांना धोका निर्माण झालाय.
पन्नास रुपयाची उधारी मागितली म्हणून लातूर मध्ये एकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.शहरातल्या म्हाडा कॉलनी येथे पान टपरी चालकाने उधारी मागितली यावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला आणि या वादातून टपरी चालक गणेश सूर्यवंशी वय 38 याची हत्या करण्यात आली आहे.तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत... दरम्यान या प्रकरणी आरोपी शहजाद शेख, आणि अब्बास शेख यांच्या विरोधात लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झालाय
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात अवैध वाळु उपसा करण्यासाठी दाखल झालेल्या तीन बोटीवर महसुल विभागाच्या पथकाने पोलिस बंदोबस्ता मध्ये कारवाई केलीय.सिना कोळेगाव धरण परीसरातील डोमगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली असुन अवैध वाळु उपसा करण्यासाठी दाखल झालेल्या तीन बोटींच्या वेगवेगळ्या भागात गॅस कटरने साह्याने छिद्र करण्यात आले तर एका बोटीला आग लावण्यात आली या कारवाईमुळे वाळु चोरांचे धाबे दणाणले आहेत.दरम्यान वाळु चोरी करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरीकांतुन केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहेत. परंतु हे केंद्र कधी बंद तर कधी नादुरुस्त अवस्थेत आढळून येतात.त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज या केंद्रावर कधीच मिळताना दिसत नाही. नऊ जून रोजी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर,मुदखेड आणि भोकर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु अर्धापूर तालुक्यात असलेल्या चेनापूर येथील स्वयंचलित हवामान केंद्रावर ताशी केवळ 38 किमी इतक्या कमी वेगाच्या वाऱ्याची नोंद झाली. एवढ्या कमी वेगाच्या वाऱ्याची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळवण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. हे स्वयंचलित हवामान केंद्र अनेक ठिकाणी बंद आहेत तर अनेक ठिकाणी नादुरुस्त अवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज अनेक वेळा चुकताना दिसतोय.
उल्हासनगरात अनेक महिन्यांपासून सिमेंट काँक्रिटीकरनाच काम सुरू आहे यासाठी शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे रस्त्यावरील पावसात होणारा चिखल आणि खड्डे यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यात अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले असून आता रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका आयुक्तांना इशारा देण्यात आला आहे की लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावेत अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला आहे
आषाढी यात्रेच्या निमित्ताने येत्या 22 जून रोजी पंढरपूर शहरामध्ये महा स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेला प्रारंभ होईल. स्वच्छता अभियानामध्ये जवळपास दीड हजार स्वयंसेवक आणि सर्व विभागातील शासकीय कर्मचारी सहभागी होणार आहेत. एकूण 22 स्वच्छता टीम तयार करून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ही स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सिडको मुख्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उरण तालुक्यातील धुतुम गावचे रहिवासी असलेले ८३ वर्षीय शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी सिडकोच्या अतिक्रमण विभागातील अधिकार्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
पीडित शेतकऱ्याच्या मुलीच्या मते, त्यांच्या वडिलांकडे चार एकर नऊ गुंठा जमीन असून, त्या जमिनीचा अद्याप सिडकोकडून मोबदला मिळालेला नाही. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते एक वाहनतळ चालवत होते. मात्र, सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने त्रास दिला जात होता.
कर्जतच्या दुर्गम भागातील दृश्य पाहिले की स्वातंत्र्याची 78 वर्षे पूर्ण होत असताना देश पारतंत्रात असल्याचे जाणवते.इंग्रजांची जुलमी राजवट आजही सरकार, प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्याच्यामागे सुरू आहे.विकासाच्या नावाखाली ढोल बडवणारे लोकप्रतिनिधींना मात्र कर्जत तालुक्यातील निखाऱ्यावरील खरे वास्तव्य लपवता येणार नाही.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलेला रस्ता अद्याप तयार होत नाही म्हणून आदिवासींच्या नशिबी डोलीयात्राच कायम आहे आणि म्हणूनच सरकारच्या बेफिकिरीमुळे अजून किती बळी घेणार म्हणून प्रश्न पुढे आला.
बोईसर एमआयडीसी रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग . हॉटेल ब्लू डायमंड जवळ उभ्या असलेल्या टँकर ने घेतला अचानक पेट . आगीचं कारण अस्पष्ट . अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल . तीन तासाच्या अथक प्रयत्न नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही . मात्र भर रस्त्यात आगीच रौद्ररूप .
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची वारी सर्वधर्मसमभाव आणि एकात्मतेचे प्रतीक म्हणजेच आषाढी वारी. वारीला कुणालाही निमंत्रण नसते तरीही वारीत मोठ्या संख्येने भाविक सामील होतात. संत तुकाराम महाराज यांचे तिसरे पुत्र नारायण महाराज यांनी देहू ते पंढरपू या आषाढी वारीला सुरुवात केली आहे. पादुका म्हणजे काय दोन चरणांना फार महत्त्व आहे. सर्वात पहिले आईचे चरण आणि दुसरे म्हणजे संतांचे म्हणजेच पांडुरंगाचे चरण होय म्हणजे पादुका. इतिहासात पादुकांची फार महत्व सांगितले गेले आहेत. वामन अवतारातही पादुकांना फार महत्त्व दिले आहे. वारीमध्ये सगळ्यात पुढे सर्व धर्मांच्या दिंड्या असतात त्यांना आज्या मेळ्याच्या दिंड्या म्हणतात.. या दिंडी सोहळ्यामध्ये पायी चालणारा ही आनंदीत असतो. जेवणाराही आनंदीत आहे आणि दान करणाराही आनंदित असतो. आमच्यावर फार मोठे संस्कार आहे. माझी आई मिरची भाकरीची आणि मिरचीचा ठेचा शिदोरी देऊन तुझ्या सोबत आणखी भाविकांना जेवण दे असं सांगायची. मोबाईलची बॅटरी ज्या पद्धतीने चार्जिंग होते, त्या पद्धतीने वारीला गेल्यानंतर भावीकही चार्जिंग होतो. अध्यात्मिक ऊर्जा मिळण्यासाठी वारीत जायला पाहिजे. स्वर्गीय आनंद असतो या वारीला गेल्यावर मिळतो. वारीमध्ये देव ऋषीमुनीही सामील होत असतात. चला पंढरीसी जाऊ रखमदेवी वर पाहू. इतर ठिकाणच्या पांडुरंगाला आपण भेटायला जातो पण इथल्या पांडुरंग जन्मोजन्मीची आपली वाट बघत असतो. वारीचे महत्त्व म्हणजे काय तर वारीमध्ये म्हातारी माणसंही तरणी होतात. नाचायला लागतात बाळगायला लागतात. सुख म्हणजे काय ते फक्त वारीमध्येच आपल्याला अनुभवला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.