पुण्यात मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक होत आहे. पुण्यातील शिवसेना भवन येथे बैठक सुरू आहे.
जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीने शिवाजी पार्कात आंदोलन केलं. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक घटक पक्षाचे नेतेही उपस्थित होते.
ठाकरे गटाच्या शिवतीर्थावरील दसरा मेळव्याला परवानगी मिळाली आहे. महापालिकेने ठाकरे सेनेला ही परवानगी दिली आहे.
गोरेगाव पश्चिम येथील एस. व्ही. रोडवर (सिटी सेंटरसमोर) असलेल्या मॅक्डोनाल्ड्स इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीत इमारतीत काही लोक अडकले असल्याची माहिती मिळत असून, घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.अग्निशमन दलाचे पथक आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
नांदेड -
हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक.
नांदेडच्या भोकर तहसीलवर बंजारा समाजाने काढला मोर्चा.
मोर्चात बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी.
पुणे -
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण
या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला पार पडणार
राहुल गांधीनी लंडनमध्ये जे भाषाण केलेय त्याचा तपास विश्रामबाग पोलिसांनी केला
हिंगोलीच्या औंढा शहरात ओबीसी आंदोलकांनी राज्यमार्ग रोखून धरत आंदोलन केले आहे, हजारोच्या संख्येने ओबीसी बांधवांनी सरकारच्या विरोधात हे रास्ता रोको आंदोलन केले आहे दरम्यान ओबीसी आंदोलनामुळे औंढा शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे थांबली होती तर चार ते पाच किलोमीटर वाहनाच्या रांगा देखील लागल्या होत्या, ओबीसी मतांच्या भरोशावर निवडून आलेले महायुती सरकार ओबीसी बांधवांचा घात करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी आंदोलकांनी केला होता.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज प्रहार संघटनेच्या वतीने "भीक मांगो" आंदोलन करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग व वयोवृद्ध लाभार्थ्यांचे मागील पाच महिन्यांचे अनुदान रखडल्याने प्रहार कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.सरकार तुपाशी दिव्यांग उपाशी,भीक दया भीक द्या आशा घोषणा देण्यात आल्या,तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी हातात पाट्या घेऊन व लोकांसमोर प्रत्यक्ष भीक मागत सरकारचे लक्ष वेधले. काही वेळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेबाहेर ठियाही धरण्यात आला.प्रहार संघटनेच्या नेत्यांनी यावेळी इशारा दिला की, "जर या महिन्याभरात दिव्यांग, निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना प्रलंबित पैसे दिले नाहीत, तर राज्यातील काही मंत्र्यांना फिरू देणार नाही."असा इशारा यावेळी देण्यात आला
सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात हिंगोलीत महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले हिंगोली, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा विधेयक तातडीने रद्द करण्याची मागणी केली तर सरकार हुकूमशाही पद्धतीने नागरिकांवर हे बिल लादत असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.
महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा विरोधात सांगलीमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलाय.राज्य सरकारच्या कायद्याचा निषेध म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायदा रद्द करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.शहरातील स्टेशन चौक येथे महाविकास आघाडीच्यावतीने सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले,यामध्ये आमदार रोहित पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते.
नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये व स्थानिक प्रशासनाच्या तसेच भारताच्या दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावाः
+977-980 860 2881 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)
+977-981 032 6134 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)
कोल्हापुरात आज इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. महावीर गार्डन पासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहे. उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले आहेत. उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ९ कोटी ६० लाख रुपये केले वर्ग
मराठा आंदोलनातील एक महत्वाची मागणी पुर्ण
मराठा आंदोलनात एकुण २५४ जणांचा मृत्यू झाला होता
यातील ९६ मृतांच्या नातेवाईकांना काल ९ कोटी ६० लाख रुपये वर्ग करण्यात आलेत
तर याआधी १५८ मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपया प्रमाणे मदत करण्यात आली होती
त्यामुळे आतापर्यंत मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या सर्वांच्या नातेवाईकांना अर्थीक मदत पुर्ण करण्यात आलीय
महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी महापालिका कार्यालयात एकत्र
जितेंद्र आव्हाड, केदार दिघे, विक्रांत चव्हाण यांची संयुक्त उपस्थिती
चर्चेत महाविकास आघाडीसोबतच मनसे नेते अविनाश जाधव देखील सहभागी
सुनावणीआधी महापालिकेच्या उपयुक्त दिनेश तायडे यांच्या दालनात सुरू बैठक
ठाणे पालिका प्रभाग रचना सुनावणीत निवडणूक आयोग व पालिका आयुक्त यांना कसं घेराच आणि आपली हरकत कशी समजून सांगायची याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती...
- १२ सप्टेंबरला नाशकात काढणार एकत्रित मोर्चा
- मोर्चासह उपस्थित राहणाऱ्या नेत्यांबाबत पत्रकार परिषदेत देणार माहिती
- दोन्ही पक्षाच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची मनसे कार्यालयात पत्रकार परिषद
आरोपी विष्णू चाटे सह सुदर्शन घुले च्या दोष मुक्तीच्या अर्जावर 24 सप्टेंबरला न्यायालय निर्णय देणार
तपाशी अधिकाऱ्यांनी कुठलीही कोर्टाची परवानगी न घेता न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले.
कपाशी अधिकारी कोर्टासारखे वागत आहेत आरोपींच्या वकिलाचे न्यायालयातील.
तर सरकारी विशेष वकील उज्वल निकम यांनी म्हटले आहे की कुठलेही प्रकारचे चुकीचे दोषारोपपत्र किंवा न्यायालयासारखे तपासी अधिकारी वागले नाहीत.
आरोपी विष्णू चाटे सुदर्शन घुले यांच्यासह इतर आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर न्यायालयात सरकारी वकील उज्वल निकम यांनी कडाडून विरोध केला.
- जन सुरक्षा विधेयक जनतेच्या हक्कावर गदा आणणारे विधेयक असल्याने याचा मविआ कडून विरोध
- व्हेरायटी चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली होणार आंदोलन
- काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित
नागरिकांनी नगर - मनमाड महामार्ग अडवला...
रस्त्याच्या कामासाठी नागरीक आक्रमक...
अनेक वर्षापासून महामार्गाची दुरावस्था...
आजतागायत अपघातात अनेकांनी गमावलाय जिव...
महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहन चालवणे जिवघेणे...
रस्ता कृती समीतीने महामार्ग अडवला...
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे नागरिक उतरले रस्त्यावर...
शिर्डी शिंगणापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
सहकारनगरात महिला जादूटोण्याचा बळी
मंत्रोच्चार,अंगारा आणि अघोरी विधी दाखवून एका महिलेला तब्बल ३ लाख १५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका ३६ वर्षीय व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
गिरीश बलभीम सुरवसे वय 36 असं फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव आहे
आरोपीने पीडित महिलेला विश्वासात घेत मंदिरात नेले.त्याठिकाणी मंत्रोच्चार करत अघोरी विधी केल्याचे भासवले.त्यानंतर अंगाऱ्याचा पेढा खाण्यास देऊन तिच्या भीतीचा गैरफायदा घेत सोन्याचे दागिने आणि रोख मिळून ३ लाख १५ हजार रुपये घेतले.
हा प्रकार २८ जुलैपासून ९ सप्टेंबर दरम्यान घडल्याचे उघड झाले आहे.
पीडितेच्या तक्रारीनंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यातील आंबेडकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी करणार जनआंदोलन
जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन
जन सुरक्षा कायद्याच्या आडून सरकार जनतेचा आवाज दाबत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप
याचाच निषेध करण्यासाठी आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे नेते करणार आंदोलन
बीडच्या गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथील सोनाली बाळू वनवे हिचा जंबुरा वस्ती येथील अनिकेत गर्जे याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. अवघ्या एक महिन्यानंतर सासरच्या लोकांनी पाच लाख रुपयांची मागणी करायला सुरुवात केली. सोनाली हिच्या माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये नेऊन दिले. मात्र मला आता तू आवडत नाहीस, मला तुझ्या सोबत राहायचे नाही असा वाद घालत नवऱ्यासह सासरच्या लोकांकडून वारंवार त्रास दिला होता. याबाबतची माहिती सोनालीने तिच्या आईला आणि माहेरच्या लोकांना दिली होती पण त्रास कमी झाला नाही. अखेर 31 ऑगस्ट रोजी सोनाली बेपत्ता झाली आणि तिचा शोध घेतला असता सासरी तिच्या घराशेजारीच असलेल्या एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचं पोलीस पंचनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा अनिकेत गर्जे, सासरा एकनाथ गर्जे, सासु प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम व सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे न्यायालयात हजर.
सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 14 वी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात.
विष्णू चाटे सुदर्शन घुले सह इतर आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आज होणार न्यायालयात युक्तिवाद.
विषय सरकारी वकील उज्वल निकम बीडमध्ये दाखल.
आरोपी वाल्मीक कराडचा देशमुक्तीचा अर्ज आणि जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळ आहे.
मात्र आता विष्णू काटे सह मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या व इतर आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर बीडच्या न्यायालयामध्ये युक्तिवाद होणार आहे.
- मध्यरात्री दोन ते पाचच्या सुमारास झाला दमदार पाऊस
- अक्कलकोट तालुक्याला पाऊस आणि झोडपल्यामुळे नदी नाले भरून वाहू लागले आहेत
- तालुक्यातील बोरगाव बादोले ते शिरवळ गावाला जोडणाऱ्या पुलावर आले पाणी
- बोरगाव बादोले,ते शिरवळ गावाला जोडणाऱ्या ओढ्याला पूर आल्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक झाली ठप्प
- बोरगाव बादोले ते शिरवळ रस्ता बंद झाल्यामुळे शाळकरी मुले आणि नागरिकांचे हाल
- तालुका प्रशासनाने शिरवळ परिसरातील गावांना दिला सतर्कतेचा इशारा..
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त घोषणा
कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
आयटीआयमध्ये अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम घेणार
१ ऑक्टोबरला राज्यातील ४१९ आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ करणार
१७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत उपक्रम
राज्यातील शेतकरी आत्महत्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.. जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांमध्ये तब्बल 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, सर्वाधिक 44 शेतकरी आत्महत्या एका महिन्यात ऑगस्टमध्ये यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहे. या 1183 शेतकरी आत्महत्या मध्ये 607 शेतकरी आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्या आणी 306 शेतकरी आत्महत्या अपात्र करण्यात आल्या. आठ महिन्यात छत्रपती संभाजी नगर विभागामध्ये 520 शेतकरी आत्महत्याची नोंद आहे, आणि पश्चिम विदर्भात 707 शेतकरी आत्महत्याची नोंद आहे, राज्यात 14 शेतकरी आत्महत्या प्रवण जिल्हे आहे. यामध्ये विदर्भातील सहा आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे आहेत, या 14 जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतल्या जातात, या आठ महिन्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचे झालेले नुकसान, कर्जबाजारीपणा, योग्य हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीच्या विविध कारणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे
तिवसा नगरपंचायतीतून व्हॅाल्मन म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने तिवसा शहरातील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली,बाबुराव मकेश्वर असे आत्महत्या करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे.रजा रोखीकरण आणि वेतन निश्चिती न झाल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. याच विवंचनेमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. दरम्यान त्यांच्या आत्महत्येला तिवसा नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी लता मकेश्वर यांनी केला आहे.2019 मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते,
मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका
एकीकडे ओबीसी उपसमितीची पहिली बैठक पार पडणार
दुसरीकडे, शिंदे समितीच्या अहवालाबाबत आज आढावा बैठक होणार
मराठा आरक्षणासंदर्भात काम करत असलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेतला जाणार
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आढावा घेणार
मंत्रालयात सकाळी ११ वाजता दोन्ही बैठका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेनंतर शिवसेना पदाधिकारी व्यक्त केली होती नाराजी
उद्योग मंत्री, संपर्क मंत्री उदय सामंत घेणार पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बैठकीत पालिका निवडणूक रणनीतीची चर्चा
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती त्यानंतर आज महत्त्वाची बैठक आहे. महापालिका निवडणुका स्वबळावर लढायच्या का महायुतीत लढायच्या यावर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जाणार
वाशीमच्या कारंजा शहरात दोन भोंदूबाबांनी एका व्यावसायिकाला बोलण्यात भूलवून सुमारे ६० हजार रुपयांची अंगठी लंपास केल्याची खळबळजनक घटना घडलीये. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
दुकानात दोन साधू दाखल झाले. साधू पाहून व्यावसायिकाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर साधूनी मधुर संवाद साधत व्यावसायिकाने आपल्या हातातील सुमारे ६ ते ७ ग्रॅम वजनाची ६० ते ७० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी साधूंना स्वखुशीने दिली. अंगठी मिळताच दोन्ही भोंदूबाबा रफूचक्कर झाले. काही वेळानंतर व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
पुण्यातील भिडे पूल आज पासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. नदी पात्रातील रस्त्याने प्रवास करणाऱ्या पुणेकरांना पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे. गणेशोत्सवामध्ये गर्दी होत असल्याने भिडे पुलाचे काम थांबूवून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मेट्रोच्या पादचारी मार्गासाठी पूल बांधण्यात येत असून त्याचं काम आजपासून पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. भिडे पूल बंद असल्याने नागरिकांनी संभाजी पूल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल चा वापर करण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर बंजारा समाजानेही ऐतिहासिक दाखले देत आरक्षणासाठी ठाम मागणी केली आहे.निजाम काळातील हैद्राबाद गॅझेट (सन 1881 ते 1918 तसेच 1941 च्या जनगणना) मधील उल्लेखानुसार बंजारा समाज हा आदिवासी घटक असून,महाराष्ट्रात त्यांचा अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात तातडीने समावेश व्हावा अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आलीय.हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची लमाणी,लमांडा, बजारा अशा विविध नावांनी स्पष्ट नोंद असून त्यांच्या खानपान,राहणीमान, विवाह पद्धती,बोली भाषा या सर्व बाबी आदिवासी घटकासारख्याच असल्याचे इतिहासात नमूद आहे.त्यामुळे समाजाला एस.टी.आरक्षण देण्यात यावे आमुची मागणी मान्य नाही झाली तर ह्या अनुषंगाने आम्ही मनोज जरांगे पाटील यांची ही भेट घेणार असून आमच्या प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवा अशी विनंती करणार असल्याचे बंजारा आंदोलक सांगत आहे
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची 14 वी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये होत आहे. या सुनावणीसाठी स्वतः विषय सरकारी वकील उज्वल निकम व सहाय्यक सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे न्यायालयात हजर राहणार आहेत विष्णू चाटे सुदर्शन घुले सह इतर आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आज न्यायालयामध्ये युक्तिवाद होणार आहे या अगोदर आरोपी आणि मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा आणि जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता मात्र दोन्ही अर्ज न्यायालयाने यापूर्वीच फेटाळे आहेत आता इतर आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज केल्यामुळे लवकरच प्रकरण चार्ज फ्रेम होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या 94 टक्के पाऊस झाला आहे. सातत्यपूर्ण पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील 65 पैकी 23 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून 26 प्रकल्पांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा आता 60 टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने दहा टक्क्यांवर असलेला उपयुक्त पाणीसाठा आता 60टक्क्यांवर आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे 23 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असले तरी जिल्ह्यातील 10 प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे. त्यामुळे हे प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे...
लातूर शहरात पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून, प्लास्टिक विरोधी मोहीम राबवली जात आहे. शहरातील गंजगोलाई भागात सिंगल युज प्लास्टिक विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे, शहरातील गोदामावर छापा टाकून , तब्बल अकराशे किलो प्लास्टिक पिशवीचा साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान प्लास्टिक बंदी असल्याने यापुढेही शहरात प्लास्टिक पिशवी वरती लातूर मनपाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी दिली आहे.
- नाशिकच्या शिलापूर परिसरातील सेंट्रल पावर रिसर्च इन्स्टिट्यूट इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर देखील राहणार उपस्थित
- या टेस्टिंग लॅबमुळे आगामी काळात नाशिकला इलेक्ट्रिक हब म्हणून मिळणार चालना
- महाराष्ट्रातील पहिल्या आणि भारतातील तिसऱ्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच आज होणार उद्घाटन
- या टेस्टिंग लॅबमुळे महाराष्ट्रासह शेजारील राज्यांना देखील होणार फायदा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन देखील उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित
- नागपूर महावितरणकडून नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा असणार बंद,
- शहरातील काँग्रेसनगर, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स, महाल आणि बुटीबोरी या विभागांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
- यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणकडून पूर्व सूचना देत केली दिलगिरी व्यक्त..
- महावितरणकडून सकाळी 8 वाजता ते दुपारी 4 दरम्यान वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळेत विद्युत पुरवठा असणार खंडित..
जळगाव, महापालिकेने निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर आठ नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यामुळे महापालिकेस सात दिवसांत एकूण १९ हरकती प्राप्त झाल्या असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केली असून, १५ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्याची मुदत दिली आहे.
नाशिकच्या मालेगाव मधिल काही शिक्षणसंस्थां मध्ये बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा उघड झाला होता,घोटाळ्या प्रकरणी काही जणांना विरोधात गुन्हा होऊन त्यांना अटक झाली होती.काल रात्री घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी,उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधिक्षकाला अटक करण्यात आली आहे.मालेगाव येथिल या.ना.जाधव संस्थेच्या अकरा व मालेगाव हायस्कुलच्या १३ शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.