बुलडाणा -
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून जयश्री शेळकेंचा सरकारवर हल्लाबोल
“सरकारची आता परीक्षा; कारवाई न झाल्यास सगळं मॅनेज असल्याचा संशय!”
बुलडाणा-
बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर प्रशासनाची विशेष उपाययोजना
पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर
आगामी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता व नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिली प्रसार माध्यमांना माहीती
- टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, रणदीप मलिक मास्टरमाइंड असल्याचा तपास यंत्रणांना संशय
- रणदीप मलिक हा अनमोल बिश्नोईचा जवळचा असल्याची क्राइम ब्रँचच्या सूत्रांची माहिती.
- मलिकने मुख्य आरोपी अनिल पंडित याच्याशी शूटर रेहान अन्सारी आणि शस्त्र पुरवठादार कुणाल सिंह यांचा संपर्क करून दिल्याचा आरोप.
- मलिकनेच रेहानला मुंबईत जाऊन अनिल पंडितच्या सूचनेनुसार काम करण्यास सांगितल्याची माहिती.
तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग; एक नौका जळून खाक
मालवण तारकर्ली किनाऱ्यावर ठेवण्यात आलेल्या रापण मासेमारीच्या दोन नौकांना रात्री अचानक आग लागली.
या आगीत एक नौका पूर्णपणे जळून खाक झाली, तर दुसऱ्या नौकेचे मोठे नुकसान झाले आहे.
या नौका नरेश कांदळगावकर आणि गुंडू कांदळगावकर यांच्या मालकीच्या आहेत त्या किनाऱ्यावर उभ्या होत्या.
अमरावती -
अमरावती जिल्ह्यातील ६०० सेवा सहकारी संस्थांना पीककर्ज वाटपातील कामकाजावरून जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश.
पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँका व सेवा सहकारी संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश.
मागील आढाव्याच्या तुलनेत पीककर्ज वाटपात केवळ ७ ते ८ टक्क्यांची वाढ; जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी.
पिंपरीतील अशोक थिएटर रस्त्यावर वाघेरे पार्कसमोर दगडांनी भरलेला डंपर पलटी झाल्याची घटना घडली आहे.
ड्रेनेज चेंबरमध्ये चाक अडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मात्र डंपर आणि जवळ उभ्या असलेल्या सीबीझेड दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
नागपूर
- नायलॉन मांजाविरोधात नागपूर पोलिसांचे अनुकरण करा, हायकोर्टाचे निर्देश
- विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश
- नायलॉन मांजाची पुरवठा साखळी तोडून मूळ स्रोत शोधण्याचे निर्देश दिले
- सिल्वासामधील कारखान्यावर छापा टाकून नागपूर ग्रामीण पोलिसांनी ६ कोटी २६ लाखांचा माल जप्त केला
दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दिल्ली पोलिस मुख्यालयाला भेट देणार
इंडिया आघाडीचा १ नोव्हेंबरला रामलीला मैदानात मार्च आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची
सीजेपी आणि कांग्रेस पक्षाच्या आंदोलनानंतर ही पहिलीच भेट
अमित शाह दुपारी ३ वाजता भेट देणार
राजधानी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार
वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
स्वातंत्र्याला 78 वर्षे झाली तरी एक आदिवासी भागात आजही मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे.
चिरेपल्ली, पत्तीगाव, कोतागुडम, मरणेली आणि खांदला या ग्रामसभांच्या सहकार्याने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या गावांना जोडणारा खांदला ते चिरेपल्ली आणि चिरेपल्ली ते आलापल्ली हा मुख्य रस्ता तात्काळ करण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे.
पुणे - अवैध हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी महिलेला ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई
वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई
आरोपी महिलेची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.