Ajit Pawar, Sharad Pawar, Ajay Mishra saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवार विश्वासघातकी ! 'त्यांच्यावर काका शरद पवारांचाही विश्वास राहिला नाही'

भाजप नेते अतुल भाेसलेंसह, विक्रम पावस्कर पत्रकार परिषदेस उपस्थित हाेते.

संभाजी थोरात

Ajit Pawar News : अजित पवार यांच्यावर त्यांचे काका (शरद पवार) देखील विश्वास ठेवत नाहीत अशी टिप्पणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (ajay kumar mishra) यांनी विराेधी पक्ष नेता अजित पवार यांच्याबाबत केली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा हे सातारा जिल्ह्याच्या दाै-यावर आहेत. माध्यमांशी बाेलताना एका प्रश्नावर मिश्रांनी अजित पवार (ajit pawar) हे विश्वासघातकी असल्याचे म्हटलं आहे.

भारतीय जनता पक्ष विरोधकांवर ईडी व अन्य विभागाच्या दबावतंत्राचा वापर करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. त्यावर आपल्याला काय वाटते या प्रश्नावर मिश्रा यांनी अजित पवार यांच्यावर त्यांचे काकाही विश्वास ठेवत नाहीत असे म्हटले.

मिश्रा म्हणाले महाराष्ट्रातील (maharashtra) विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी दबावतंत्राने मिळवले आहे. मुख्यमंत्री पदासाठी सुध्दा ते समझोता करणारे आहेत. त्यामुळे राहुल गांधी व अजित पवार यांच्यावर काय बोलायचे असेही मिश्रा यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

Dhananjay Munde vs Manoj Jarange: धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध की अस्तित्वाचा संघर्ष?

SCROLL FOR NEXT