Maharashtra Live News Update : Saam Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: घरकुल कामासाठी ३ हजारांची लाच घेताना सावरगावचा ग्रामरोजगार सेवक (acb)च्या जाळ्यात

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

घरकुल कामासाठी ३ हजारांची लाच घेताना सावरगावचा ग्रामरोजगार सेवक (acb)च्या जाळ्यात

नाशिकच्या येवला तालुक्यातील बहु चर्चित असलेल्या सावरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवकाला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. संजय वाघ असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, घरकुल मंजुरीच्या बदल्यात त्याने ही लाचेची मागणी केली होती.

बेकायदा गर्भलिंगनिदान प्रकरणाची व्याप्ती वाढली, आणखी एका डॉक्टरसह दोन एजंट गजाआड

राहाता तालुक्यातील बेकायदा गर्भलिंगनिदान प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे.. या प्रकरणात पोलिसांनी गर्भपात करणाऱ्या श्रीरामपूर येथील डॉक्टर रवींद्र कुटेसह आणखी दोन एजंट ताब्यात घेतले आहेत.. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात, निर्जनस्थळी असलेल्या एका खोलीत गर्भवती महिलांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात होती.. पोलिसांनी वैद्यकीय पथकासह धाड टाकत तपासणीसाठी लागणारे साहित्य आणि एक डॉक्टर, एजंट तसेच महिलांच्या नातेवाईक अशा दहा जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले होते.. पोलिस तपासात श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे हा बेकायदा गर्भपात करत असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यासह आणखी दोन एजंटला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.. या प्रकरणाची व्याप्ती पुणे जिल्ह्यापर्यंत पोहचण्याची शक्यता असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पुण्यात महिलेची छेड काढल्याचा आरोप, नागरिकांनी वायर ने बांधलं आणि दिला चोप

पुण्यात नसरापूर आणि पर्वती भागातील घटना ताजी आहे आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळतोय. असं असतानाच आता पुण्यात महिलेची छेड काढल्याचा आरोप करत नागरिकांनी एका तरुणाला बेदम चोप दिला. पुण्यातील राजाराम पुलाजवळ ही घटना घडली असून याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. संबंधित तरुण हा एका महिलेची छेड काढत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं, त्यानंतर तिथे जमा झालेल्या नागरिकांनी या तरुणाला लाईटच्या खांबाला एका वायर ने बांधलं आणि चोप दिला. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले..

Maharashtra News Live Update: सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

- अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

- मध्यरात्री 1 वाजता शहरातील शेळगी उड्डाण पुलावर हा अपघात झालाय

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात बिबट्याचा थरार; दुचाकीवर बसलेल्या १० वर्षीय मुलावर हल्ला

शिरोली बुद्रूक येथे गावातून घराकडे जात असताना वडिलांसोबत दुचाकीवर बसलेल्या गणेश बोऱ्हाडे हा १० वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यावेळी शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवरील मुलाला लक्ष्य करत हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत मुलाला वाचवले. त्यानंतर बिबट्या शेतीच्या दिशेने पसार झाला. जखमी गणेशवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एकत्र ₹३००० जमा होणार, हप्त्याची संभाव्य तारीख आली समोर, वाचा अपडेट

Pension Scheme : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पेन्शनचा प्रश्न अखेर सुटला, वाचा नेमका काय घेतला निर्णय?

केरळच्या मुख्यमंत्रिपदी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी? राज्यात खलबत|VIDEO

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ; वासरासाठी गायीनं केला गाडीचा पाठलाग

Mango vs Aamras : 'आंबा' की 'आमरस' उन्हाळ्यात शरीरासाठी काय खाणं योग्य? वाचा

SCROLL FOR NEXT