Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल; विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

अंगारकी चतुर्थी निमित्त लाखो भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी राजुरमध्ये दाखल

अंगारकी चतुर्थी निमित्त जालन्यातील राजुर येथे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे अंगारकी चतुर्थी निमित्त लाखो भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी राजूरमध्ये दाखल झाले आहेत. आज तब्बल 12 लाख भाविक राजुरेश्वराचे दर्शन घेणार आहेत.महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून राजुरेश्वरांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यामुळे गर्दी लक्षात घेऊन भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनातर्फे विविध उपायोजना राबविण्यात आल्या असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे,

- एका महिला कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू  

नागपूर एसबीएल कंपनीत 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटातील आणखी एका महिला कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय

- दुर्गा घाडगे व 33 वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे

- त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता 27 वर पोहोचली आहे

- नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील रावळगाव येथील एसबीएल कंपनीत एक मार्च रोजी भीषण स्फोट झाला होता

- त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून दुर्गा घाडगे यांची मृत्यूशी झुंज सुरू होती

सोलापूर - बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाचजणांना पोलिस कोठडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील पाच आरोपींना अटक करून त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.या आरोपींना ८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मृत गायत्री मस्के यांचे बंधू दिलीप चांदोरे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मंगळवार (ता. ५) उपलब्ध करून देण्यात येत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरता येणार आहेत.

भिवंडीत निसर्गाचा चमत्कार आंब्याच्या झाडाला आले सीताफळ, नागरिकांमध्ये आश्चर्य

भिवंडी तालुक्यातील साईगाव येथे निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळत असून, येथील एका आंब्याच्या झाडाला चक्क सीताफळ लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्मिळ घटनेमुळे परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

विद्युत विभागाची लोडशेडिंग ज्येष्ठ नागरिकांचा उष्णतेने जीव धोक्यात

सध्या हिंगोलीत ग्रामीण भागात वीज वितरण विभागाने सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत विजेच्या लोड शेडिंग जाहीर केली आहे याचा थेट परिणाम गावात कितपत पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे, दिवसभर झाडाच्या सावलीत राहणारे हे जेष्ठ नागरिक सायंकाळी झोपण्यासाठी घरात आल्यानंतर उष्णतेने हैराण होत आहेत तर दिवसभर शेतात काम करून आलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील याचा त्रास होतोय त्यामुळे विद्युत विभागाने नियमांमध्ये बदल करण्याची मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आहे

अंगारकी संकष्टी निमित्त गणपतीपुळे मंदिरात गर्दी

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे मंदिरात भाविकांमी गर्दी केलीय. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक गणपतीपुळ्यात दाखल झालेत. मे महिन्यात अंगारकी आल्यामुळे यंदा गणपतीपुळ्यात दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या ही 70 ते 80 हजारच्या घरात असेल असा अंदाज गणपतीपुळे देवस्थानाने वर्तवला आहे.

लातूरमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, पंपावर वाहनांच्या रांगा

लातूर जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे ,जिल्ह्यातला काही पेट्रोल पंपावर एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत, तर अनेक पेट्रोल पंप बंद अवस्थेत आहेत, अचानक पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी इंधनासाठी मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर लावले आहेत.

अक्षय कर्डिले विजय झाल्यानंतर आमदार म्हणून घरात पाऊल ठेवल्यानंतर कुटुंबात भावनिक वातावरण

राहुरी पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा एक लाखांपेक्षा अधिक मदत मताधिक्याने विजय झाला दुपारपासूनच संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन रात्री उशिरा अक्षय कर्डिले हे घरी पोहोचल्यानंतर अत्यंत भावनिक असे वातावरण निर्माण झाले होते.स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती त्या जागेवर अक्षय कर्डिले यांनी मोठ्या फरकाने विजय मिळाला असला तरी वडिलांच्या जागेवर मिळवलेला विजय आणि दुसरीकडे वडील गमावल्याचे दुःख एकाच वेळी असल्याने घरी आल्यानंतर अक्षय कर्डिले यांना आपल्या आईसमोर अश्रू अनावर झाले आपल्या स्वर्गीय वडिलांच्या आठवणीने संपूर्ण कुटुंबीय भावनिक झाले होते. एकीकडे मुलगा जिंकण्याची खुशी तर दुसरीकडे पती गमावल्याचे दुःख अक्षय कर्डीले यांच्या आईला होते त्यामुळे दोघांनीही अश्रुला मोकळी वाट करून दिली हा भावनिक क्षण अत्यंत वेदनादायक असा होता.

nashik-malegaon-परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, साहाय्यक प्राध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिकच्या मालेगाव मधिल एका नामांकित कॉलेज मध्ये धक्का दायक घटना घडली असून,परिक्षार्थी विद्यार्थीनी कडे एका सहाय्यक प्राध्यापकाने शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पेपरसाठी संशयीत प्राध्यापकाची एका वर्गावर पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पेपर संपल्याने दुपारी १२ वाजेपूर्वी वर्गातील इतर सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर निघून गेले होते. मात्र, तक्रारदार विद्यार्थिनीचा पेपर पूर्ण व्हायचा बाकी असल्याने ती वर्गात शेवटपर्यंत बसून पेपर लिहित होती. यावेळी वर्गात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयित प्राध्यापकाने या विद्यार्थिनीजवळ जाऊन तिच्याकडे अश्लील मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महाविद्यालयीन व संबंधित संस्थेच्या प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून साहाय्यक प्राध्यापक वाजिद अली यास तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई केली आहे.तर हिंदुत्ववादी संघटनांच्या कानावर हे वृत्त जाताच त्यांनी मालेगाव कॅम्प पोलिसात धाव घेत या प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur : नसरापूर प्रकरणात संतापजनक खुलासा, आरडाओरडा करू नये म्हणून केलं भयानक कृत्य, वाचून राग अनावर येईल

Riteish-Raja Shivaji Collection : बॉक्स ऑफिसवर रितेशचाच बोलबाला; 'राजा शिवाजी' सोमवारीही हाऊसफुल, बक्कळ कमाई करून बनवला रेकॉर्ड

Bank Rules : तुमच्या अकाउंटमधून पैसे आपोआप कट होतायत? काय आहे बँकेचे नियम, जाणून घ्या

कंगना रणौत-राहुल गांधींच्या लग्नाची पोस्ट खरी की खोटी? सोशल मीडियावर चर्चा, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना लॉटरी लागणार! एकाच वेळी खात्यात ४५०० जमा होणार; मार्च-एप्रिल हप्त्याची अपडेट

SCROLL FOR NEXT