Ahmednagar! दबा धरून बसलेल्या बिबट्याने घेतला नरडीचा घोट; महिलेचा भयावह शेवट...(पहा Video) गोविंद साळुंके
महाराष्ट्र

थरारक घटना! दबा धरून बसलेल्या बिबट्याने घेतला नरडीचा घोट; महिलेचा भयावह शेवट...(पहा Video)

संगमनेर तालुक्यातील मेंढवन गावच्या शिवारात बिबट्याने हल्ला केल्याने महिलेचा जागीच मृत्यू

गोविंद साळुंके

अहमदनगर: संगमनेर (Sangamner) तालुक्यातील मेंढवन गावच्या (village) शिवारात बिबट्याने (Leopard) हल्ला केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हिराबाई एकनाथ बडे (वय- 45) असे बिबट्याच्या हल्ल्यात (attack) ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. हिराबाई बडे या रात्री घराबाहेर निघाले असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत अक्षरशा त्यांच्या नरडीचा घोट घेतला आहे. त्यांना तातडीने त्यांना जवळच्या नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले होते. (Ahmednagar Woman killed in leopard attack)

पहा व्हिडिओ-

मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे, तर दुसर्‍या घटनेत जवळच्याच धांदरफळ गावांमध्ये रात्रीच्यावेळी भर वस्तीत बिबट्याचा (Leopard) संचार सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर (Sangamner) तालुक्यातील धांदरफळ गावात रात्रीच्या वेळी भर वस्तीती बिबट्याचा संचार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

मेंढवन गावात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना ताजी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे वनविभागाने (Forest Department) पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT