Sangamner Accident Saam tv
महाराष्ट्र

Sangamner Accident : भीषण अपघात; कंटेनरची दुचाकीला धडक, तीन तरुणांचा मृत्यू

Ahmednagar news : दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकल वरील तिघेही फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे

संगमनेर (अहमदनगर) :  भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना (Sangamner) संगमनेर तालुक्यातील नांदूर शिंगोटे - लोणी रस्त्यावरील नीमोन गावाजवळ घडली. हा अपघात २० एप्रिलला सायंकाळच्या सुमारास घडला. (maharashtra News)

नगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमोण गावाजवळ घडला. सदरच्या अपघातामध्ये (Accident) नांदुर- शिंगोटे येथील आदिवासी कुटुंबातील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय ३०), व युवराज धोंडीबा मेंगाळ (वय २९) व संदीप सोमनाथ आगविले (रा, गर्दनी, ता. अकोले) हे तिघे मोटरसायकलने जात होते. याच वेळी कंटेनरने मोटारसायकलला धडक दिली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकल वरील तिघेही फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा आज सकाळी उपचारादरम्यान (death) मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच नांदुर-शिंगोटे येथील ग्रामस्थांनी धाव घेऊन तिघांना रुग्णालयात दाखल केले. परंतु यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आदिवासी पाड्यातील हे तिघेही तरुण ठार झाल्यामुळे आदिवासी बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातस्थळी असलेला कंटेनर ताब्यात घेतला व गुन्ह्याची माहिती घेऊन पंचनामा करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT