Accident CCTV Footage Saam Tv
महाराष्ट्र

Accident CCTV Footage: विचित्र अपघात! अचानक भोवऱ्यासारखी फिरली टेम्पो रिक्षा; दोघेजण हेलपटले, नेमकं काय घडलं?

Accident CCTV Footage: अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सध्या गुलमोहर रोडचे रस्ता रुंदीकरण काम सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Accident News : अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड भागामध्ये एक विचित्र अपघात समोर आला आहे. अपघातामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. या अपघाताचं सीसीटीव्ही फूटेजही समोर आलं आहे. (CCTV Footage)

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सध्या गुलमोहर रोडचे रस्ता रुंदीकरण काम सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरण केल्यानंतर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले लाईटचे खांब हे रस्त्याच्या मधेच आल्याने अनेक अपघात (Accident) या रोडवरील विजेच्या खांबांमुळे होत आहेत.

विजेच्या खांबांना तारांचा आधार दिला जात आहे. मात्र या आधार दिलेल्या तारांमुळे अनेक अपघात होत आहेत. असाच एक तीन चाकी मालवाहू रिक्षाचा अपघात समोर आला आहे. मालवाहू रिक्षा लाईटच्या खांबाला आधारासाठी उभ्या केलेल्या तारेला जाऊन धडकली. वेगात असलेल्या या रिक्षाने धडकेनंतर तीन वेळा पलटी मारली. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अपघातात रिक्षा चालक आणि त्याच्या शेजारी बसलेला दुसरा एक व्यक्ती जखमी झाला आहे. मात्र हे खांब लवकरात लवकर काढून टाकावे अशी मागणी आता नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले

पवार कुटुंब दिल्लीत, विलिनीकरणाला वेग? सुनेत्रा पवारांनी घेतली मोदी-शाहांची भेट

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा; अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरला?

अजितदादांची राजकीय हत्या? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ, VIDEO

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवराय अन् बाळासाहेब ठाकरेंचा विसर; किशोरी पेडणेकर यांचा जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT