Ahmednagar Police Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Police: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले दोघे जेरबंद, अहमदनगर पोलिसांची मोठी कारवाई

दरोड्याच्या तयारीत असणारे 2 अट्टल दरोडेखोर श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही, अहमदनगर

अहमदनगर: दरोड्याच्या तयारीत असणारे 2 अट्टल दरोडेखोर श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहेत. पोलिसांनी छापा टाकून या दरोडेखोरांना अटक केलीये. तर, चार आरोपी पळून गेले आहेत. यांच्याकडून 1 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे (Ahmednagar Police Arrest Two Robbers After Secret information).

अहमदनगर (Ahmednagar) पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाकी की, अहमदनगर सोलापूर रोडवर मांडवगन बन-पिंपरीजवळ काही सराईत गुन्हेगार दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथे छापा टाकला. तेव्हा पोलीस (Police) आलेले पाहून आरोपी पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करुन दोन दरोडेघोरांना अटक केली, तर 4 आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

गहिनीनाथ उर्फ गहिण्या इश्र्वर्या भोसले आणि सोन्या उर्फ लाल्या ईश्र्वर्या भोसले अशी अटक (Arrest) केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्याच्याकडून 2 मोटरसायकल, लोखंडी कटावणी, लोखंडी चाकू, दोरी, मिरचीची पूड, पाना, असा एकूण 1 लाख 21 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हे दोन्ही गुन्हेगार सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अहमदनगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दरोडा, चोरी, घरफोडी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह आख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT