Srirampur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Shrirampur News : बायकोवरचा राग, तरुणाने थेट मेहुण्याच्या बाळाला संपवलं; मन सुन्न करणाऱ्या घटनेनं श्रीरामपूर हादरलं

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही

बायको नांदायला येत नाही म्हणून तरुणाला राग अनावर झाला. त्याने थेट सासुरवाडी गाठत मेहुण्याच्या ३ वर्षीय बाळाचं अपहरण केलं. इतक्यावरच न थांबता त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर मृतदेह मक्याच्या शेतात नेऊन फेकला. तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही संतापजनक घटना श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली.

राहुल बोधक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर स्नेहदीप असं हत्या झालेल्या बाळाचं नाव आहे. आपणच स्नेहदीपची हत्या केली, अशी कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वैजापूर तालुक्यात (Vaijapur News) रहिवासी आहे. सततच्या भांडणामुळे त्याची बायको श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे माहेरी निघून गेली होती. ती परत नांदायला येत नसल्याने आरोपीला राग अनावर झाला. आठ दिवसांपूर्वी आरोपीने आपलं सासर गाठलं.

तिथे मेव्हण्याशी (बायकोच्या भावाशी) वाद झाल्यानंतर त्याने ३ वर्षीय बाळाचं अपहरण केलं. यासंदर्भात ६ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर (Srirampur) तालुका पोलीस ठाण्यात आरोपी राहुल बोधक याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

मात्र, मृतदेह नेमका कुठे फेकला याबाबत विचारणा केली असता आरोपी राहुल उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी सर्व बाजूने तपास करत प्रकरणाचे धागेदोरे जुळवले आणि अखेर वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते संभाजीनगर रोडवरील गारच शिवारातील एका मक्याच्या शेतात चिमुकल्याचा मृतदेह शोधून काढला.

नराधम आरोपी राहुल बोधक याने स्नेहदिप याला तोंड दाबून मारल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्येचा अधिक उलगडा होणार आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

SCROLL FOR NEXT