Sanjay Raut Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे गटाचा पुन्हा 'सांगली' पॅटर्न! अंतिम चर्चेआधीच संजय राऊतांनी २ जागांवर दावा ठोकला; 'मविआ'त वादाची ठिणगी

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेपर्यंत या आघाड्या अभेद्य राहणार की नाही? जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल? याबाबत चर्चा झाली नसतानाच संजय राऊत यांनी दोन जागांवर दावा ठोकला आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. १४ जुलै २०२४

अहमदनगर येथील श्रीगोंदा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी श्रीगोंदा अन् अहमदनगर शहरची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचे जाहीर केले. मात्र महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चाही सुरू झाली नसताना संजय राऊतांनी दोन जागांवर दावा ठोकल्याने मविआमध्ये वादाची ठिगणी पडण्याची शक्यता आहे.

राज्याच्या राजकारणात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्ष कामाला लागले असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पुन्हा एकदा जागा वाटपावरुन कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विधानसभेपर्यंत या आघाड्या अभेद्य राहणार की नाही? जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल? याबाबत चर्चा झाली नसतानाच संजय राऊत यांनी दोन जागांवर दावा ठोकला आहे.

संजय राऊत यांनी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना श्रीगोंदा येथील जागा शिवसेना उपनेते साजन पाचपुते लढणार असल्याचे भाषणात जाहीर केले आहे. तसेच अहमदनगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेचीच असून त्या ठिकाणीही तयारीला लागा अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात.

त्या ठिकाणी आलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नगर शहर विधानसभा मतदार संघ आपलाच आहे त्यासाठी कामाला लागा उमेदवार नंतर ठरवू असा संदेश खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता सांगलीप्रमाणे पुन्हा एकदा मविआमध्ये वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT