Sangamner News Saam tv
महाराष्ट्र

Sangamner News : विधानसभेआधीच खासदार प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ; बाळासाहेब थोरातांच्या कन्येचे घेतलं नाव

Ahmednagar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या पुढाकाराने संगमनेर शहरात भव्य महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहमदनगर) : बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचे महिला सक्षमीकरणासाठी चांगले काम असून राजकारणात देखील त्या चांगले काम करू शकतील. यामुळे विधानसभेच्या पुढील निवडणुकीत जयश्री थोरात याना उमेदवारी करण्याची संधी मिळावी, असे भाष्य खासदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या पुढाकाराने संगमनेर शहरात भव्य महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. या मेळाव्यात प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी जयश्री थोरात यांच्या विधानसभा उमेदवारीबाबत भाष्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र त्यांना विधानसभेत यायाचं की नाही हे त्यांनीच ठरवावे; अशी प्रतिक्रिया देखील प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. 

काय म्हणाल्या जयश्री थोरात 


प्रणिती शिंदे यांनी केलेल्या भाष्याबद्दल विचारले असता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी देखील सूचक वक्तव्य केले आहे. पुढे विधानसभा निवडणूक लढवायचीच आहे. मात्र आत्ताची की भविष्यातील हे साहेब ठरवतील, असं जयश्री थोरात यांनी म्हंटल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये काही ट्विस्ट येतो का याची उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

SCROLL FOR NEXT