Rohit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar: सत्‍य काय हे माहित नाही, परंतु खरा इतिहास लोकांना सांगा; आमदार रोहित पवार यांनी मांडले मत

सत्‍य काय हे माहित नाही, परंतु खरा इतिहास लोकांना सांगा; रोहित पवार यांनी मांडले मत

सचिन आगरवाल

अहमदनगर : सावरकरांच्या पुस्तकात काय लिहिले आहे, काय मुद्दे आहेत. तसेच राहुल गांधींनी (Rahul Gandhi) जे पत्र दाखवल त्यात काय आहे. काय सत्य आहे, हे माहित नाही. परंतु जो खरा इतिहास आहे तो लोकांना सांगा; असे वक्तव्य (Rohit Pawar) आमदार रोहित पवार यांनी केले. (Breaking Marathi News)

भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सावकारांच्या बाबतीत माझा अभ्यास कमी आहे. मी त्यांचे पुस्तक वाचलेले नाही. राहुल गांधींनी जे पत्र दाखवले ते सुद्धा मी वाचलेले नाही. जो विरोध सध्या सुरू आहे; त्यावर मला बोलायचे नाही. खर काय हे जेव्हा लोकांसमोर येईल तेव्हा लोक त्या पद्धतीने भूमिका घेतील अस ही आमदार रोहित पवार म्हणाले.

शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून महाविकास आघाडीत फूट पडेल असे म्हणाले. यावर रोहित पवार यांनी काय होईल का होईल? राजकारण बाजूला ठेवा. इतिहास काय खरा हे आले पाहिजे. सावरकर यांचा इतिहास कळला पाहिजे. चर्चा झाली पाहिजे ती चर्चा कोणीच घडून आणत नाही. ती घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अस रोहित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT