Ahmednagar News indurikar maharaj court hearing today sangamner court in controversial statement Saam TV
महाराष्ट्र

Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार? वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी

Indurikar Maharaj Latest Updates: २०२० साली इंदुरीकर महाराजांनी अपत्य प्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही

Indurikar Maharaj Latest Updates

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अपत्य प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी PCPNDT कलमांतर्गत दाखल गुन्ह्याची आज संगमनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे. समन्स न मिळाल्याने मागील महिन्यातील सुनावणीसाठी इंदुरीकर महाराज गैरहजर होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजच्या सुनावणीसाठी ते स्वतः हजर राहून जामीनासाठी अर्ज करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर (Indurikar Maharaj) महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. २०२० साली इंदुरीकर महाराजांनी अपत्य प्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर चांगलीच टीका झाली होती. काहींनी यावर आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर इंदुरीकरांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, २०२० साली दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

पण, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला होता. पुढे तोच आदेश सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला. त्यामुळे इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर कोर्टात हा खटला नव्याने सुरू झाला आहे.

मागील महिन्यात कोर्टाने समन्स बजावले होते. मात्र इंदोरीकर महाराज १३ ऑक्टोबरच्या सुनावणीसाठी गैरहजर होते. समन्स घेऊन गेलो असता इंदुरीकर महाराज भेटले नाही असा रिपोर्ट पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आला होता. या प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी होणार असून इंदुरीकर आज कोर्टात हजर राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT