death saam tv
महाराष्ट्र

दुर्देवी..नवविवाहित पती-पत्नीचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दुर्देवी..नवविवाहित पती-पत्नीचा शेततळ्यात बुडून मृत्यू

गोविंद साळुंके

अहमदनगर : शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहित पती- पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पतीला वाचविण्यासाठी पत्‍नीने पाण्यात उडी मारली; परंतु यात (Ahmednagar) त्‍यांचा मृत्‍यू झाला. (ahmednagar news Husband and wife drowned in a field)

कोपरगांव (Kopargaon) तालुक्‍यातील आंचलगाव शिवारात शिंदे कुटुंबियांच्या घरजवळच शेततळे आहे. नेहमीप्रमाणे पूजा शिंदे (वय २२) आणि निलेश शिंदे (वय २७) दोघे जनावरांसाठी पाणी आणण्यासाठी गेले होते. यावेळी निलेशचा तळ्यातील प्लास्टिकच्या कागदावरून पाय घसरून तळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी पूजाने पाण्यात उडी मारली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडवून त्‍यांचा मृत्यू झाला. घडनेची माहिती मिळताच कोरपगाव पोलीस (Police) घटनास्थळी दाखल होत मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले. त्यांना कोपरगावातील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले; मात्र डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत घोषित केले.

वर्षभरापुर्वीच विवाह

निलेश आणि पूजाचा एक वर्षांपूवी विवाह झाला होता. सर्व काही आनंदात संसाराचा गाडा सुरू होता; अशातच काळाने घाला घातला आणि नवं विवाहित पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यात फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्या दिवशी हॉटेल, क्लब रात्री २.३० पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

Pune Crime: पुण्यात कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या, व्हिडीओ शूट करत संपवलं आयुष्य

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात मोठी दुर्घटना, रोहिंग्या निर्वासितांच्या बोटी उलटल्या, ५०० हून अधिक जणांचा मृत्यू

डायबिटीजमध्ये दही खाल्ल्याने शरीरावर काय होतो परिणाम? रक्तातील साखर वाढते की कमी होते?

Adinath-Urmila Divorce: पती-पत्नी म्हणून वेगळे...; १६ वर्षांचा संसार मोडला, आदिनाथ कोठारे-उर्मिला कानेटकर यांनी घेतला घटस्फोट

SCROLL FOR NEXT