Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : अध्यक्ष बदलावरून विश्वस्तांमध्ये हाणामारी; मढी देवस्थानच्या बैठकीतील प्रकार

Ahmednagar News : अहमदनगरच्या मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहमदनगर : येथील प्रसिद्ध असलेल्या मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलासाठी बैठक बोलावण्यात आली होती. (Ahmednagar) अध्यक्ष बदलासाठी आज बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.  या प्रकारामुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

अहमदनगरच्या मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता. अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच तेथे दोन गटात राडा झाला. दरम्यान विश्वस्तांमध्ये बाचाबाची सुरू (Crime News) असताना काही स्थानिक ग्रामस्थ यामध्ये पडले. परिणामी बाचाबाचीचं रुपांतर लाठ्या-काठ्यांनी हाणामारीपर्यंत गेले. या घटनेमध्ये अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामस्थही झाले जखमी 
हाणामारीमध्ये गावातील काही लोकांचा देखील सहभाग होता. यामुळे विश्वस्तांसह काही ग्रामस्थ देखील जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी पाथर्डी ग्रामीण रुग्णालय व पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. जखमींवर उपचार सुरू असून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT