Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: ड्युटीवरून घरी गेल्‍या अन्‌ महिला पोलीस कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल

महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

अहमदनगर : महिला पोलीस कर्मचारीने गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याची घटना समोर आली आहे. अर्चना रावसाहेब कासार असे मयत महिला पोलिसाचे (Police) नाव आहे. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Letest Marathi News)

अहमदनगर (Ahmednagar) पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात अर्चना कासार या कार्यरत होत्‍या. शनिवारी रात्री त्यांची ड्युटी संपवून रविवारी सकाळी त्या अहमदनगर शहरातील बोल्हेगाव उपनगरात असलेल्या घरी गेल्या. मात्र काही वेळानंतर घरातील त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या मुलाला संशय आला. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवून घेऊन दरवाजा उघडला असता अर्चना कासार या गळाफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्या होत्या.

या घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आणि त्यांच्या पथकाने तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. मात्र त्याआधीच अर्चना कासार मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुसाईड नोटमध्‍ये काय?

अर्चना कासार यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर अनुकंप तत्त्वावर त्या जिल्हा पोलीस दलामध्ये भरती झाल्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असून घरगुती कारणातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली आहे. मात्र त्यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट मिळाली असल्याची कुजबूज सुरू असून त्याबाबत पोलीस प्रशासन काही बोलण्यास तयार नाही. या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आणखी तिघांची होणार नार्को टेस्ट

Mangalsutra Desingn: 'नो पेंडंट' मंगळसूत्राच्या 5 हटके डिझाईन्स, कोणत्याही साडीवर उठून दिसतील

Viral Video: अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंगमध्ये नाचला शुभमन गिल? व्हायरल व्हिडीओमध्ये चर्चांना उधाण

नाद फक्त 'यामाहा'चा! मौजमजा, नशेसाठी पुण्याच्या तरुणांनी चोरल्या दुचाकी

Shocking: MBBS च्या विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या, Sorry म्हणण्यासाठी बॉयफ्रेंडने पनवेलच्या जंगलात आत्म्याला बोलावलं अन्...

SCROLL FOR NEXT