Ahmednagar News Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: दारूची नशा जीवावर बेतली; हॉटेलच्या टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून मित्रांची चौकशी सुरू

Drunk Youth Death After Falling From Hotel Terrace: अहमदनगरमध्ये हॉटेलच्या टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. हा तरूण दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Rohini Gudaghe

सचिन थोरात, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यामधून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. या तरूणाचा हॉटेलच्या टेरेसवरून पडून मृ्त्यू झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरूण दारूच्या नशेत होता. त्यामुळेच तोल जावून पडल्याने त्याचा मृ्त्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवविला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.

नक्की काय घडलं?

बुलढाणा जिल्ह्यातील चार मित्र फिरण्यासाठी शिर्डीत आले (Ahmednagar News) होते. तेव्हा ते एका हॉटेलमध्ये थांबलेले होते. परंतु या चार मित्रांनी दारू प्यायली आणि ते फिरण्यासाठी हॉटेलच्या टेरेसवर गेले. त्यावेळी शुभम नारखेडे या तरुणाचा दारूच्या नशेमुळे तोल गेला अन् तो थेट टेरेसवरून खाली पडला. उंचावरून खाली पडल्यामुळे या तरूणाचा मृत्यू झालाय. या तरूणाचं वय २५ वर्षे असल्याची माहिती मिळत आहे.

शिर्डी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

अहमदनगरमधून दारूची नशा जीवावर बेतल्याची (Drunk Youth Death) घटना आज सकाळी समोर आलीय. हॉटेलच्या टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू झालाय. बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाचा शिर्डीत मृत्यू झाल्याचं समोर आलंय. चार मित्र शिर्डीत साईदर्शनाला आले होते. मात्र, दारूच्या नशेत हॉटेलच्या टेरेसवरून पडून २५ वर्षीय शुभम नारखेडे या तरुणाचा मृत्यू झालाय. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू (Youth Death After Falling From Hotel Terrace) आहे. पोलीस या प्रकरणी तरूणाच्या मित्रांची चौकशी करत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील शिर्डीला आलेल्या साईभक्ताचा मृत्यू झालाय. दारूच्या नशेत चौघेजण हॉटेलच्या टेरेसवर चढले. अंदाज न आल्याने एक मित्र खाली पडला, त्यातच त्याचा मृत्यु झालाय. शिर्डीनजिक निमगाव को-हाळे येथे हॉटेल साई सिमरन येथे हा प्रकार घडलाय. शुभम नारखेडे (वय 25 रा. शेंभा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा) येथील हा तरुण होता. शिर्डी पोलिसांच्या वतीनं अधिक तपास सुरू आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT