Robbery 
महाराष्ट्र

पहाटेचा थरार..घरात घुसून पती– पत्नीस चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लुटले

पहाटेचा थरार..घरात शिरत पती– पत्नीस चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लुटले

गोविंद साळुंके

अहमदनर : बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे ओम साई पेट्रोल पंपसमोरील नेहे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी प्रवेश केला. पहाटेच्‍या सुमारास हा थरार घडला असून पती– पत्नीला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकून तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती जवळील नागरिकांना कळताच पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेत आहे. (Ahmednagar-news-crime-Husband-and-wife-were-robbed-by-thieves-at-home)

अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे ओम साई पेट्रोल पंपासमोर बाळासाहेब नेहे यांच्या बंगल्यावर धाडसी दरोडा (Theft) टाकला. सहा चोरट्यांनी पहाटे दोन ते अडीच्या सुमारास बंगल्याचा दरवाजा उघडून सहा चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला.

गळ्याला लावला चाकू

घरात बाळासाहेब नेहे आणि त्यांच्या पत्नी हे दोघांनाही जाग आली. यावेळी चोरट्यांनी दोघांनाही चाकूचा धाक दाखवत रोख रक्कमेसह सहा तोळे सोने घेऊन पसार झाले. घटनेची माहिती कळताच श्रीरामपूर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT