Ahmednagar News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News : खेळता खेळता ४ वर्षीय चिमुकल्याचा हौदात पडून मृत्यू, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Ahmednagar Crime News : खेळता खेळता अंगातील पाण्याच्या हौदात पडून एका 4 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात घडली.

Satish Daud

सुशील थोरात, साम टीव्ही

खेळता खेळता अंगातील पाण्याच्या हौदात पडून एका 4 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवारी (4 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली. समर शेख असं मृत मुलाचे नाव आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय.

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरातील (Ahmednagar News ) मुकुंदनगर परिसरात शेख कुटुंबीय राहतात. सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा 4 वर्षीय मुलगा समर शेख हा अंगात खेळत होता. दरम्यान, खेळता खेळता तो पाण्याचा हौदाजवळ गेला.

हौदावर झाकण ठेवण्यात आले होते. याच झाकणावर समर शेख हा उभा राहिला. मात्र, झाकण कुचकामी असल्याने समर हा हौदात पडला. पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही समर हा कुठे दिसत नसल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध घेतली.

तब्बल 5 तास शोधाशोध करूनही समर कुठेही दिसून आला नाही. यावेळी एका व्यक्तीने हौदात डोकावून बघितले असता, समरचा मृतदेह हौदाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. डोळ्यादेखत चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने समरच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.

दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांनी मुकंदनगर परिसरात मोठी गर्दी केली होती. समरचा मृतदेह हौदातून बाहेर काढण्यात आला. हौदाचे झाकण न बसविणाऱ्या संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी समरच्या कुटुंबियांनी केली आहे. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT