Ahmednagar News 4 accused are absconding from Sangamner Jail Police are searching Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: खळबळजनक! कारागृहाचे गज तोडून ४ कैद्यांनी ठोकली धूम; पोलिसांची उडाली झोप, संगमनेरमधील घटना

Sangamner News: संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यातून सुमारास ४ कैद्यांनी पलायन केलं आहे. कारागृहाचे गज तोडून हे चारही कैदी फरार झाले आहेत.

Satish Daud

सचिन बनसोड, साम टीव्ही

Sangamner Jail Accused Absconding

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यातून सुमारास ४ कैद्यांनी पलायन केलं आहे. कारागृहाचे गज तोडून हे चारही कैदी फरार झाले आहेत. बुधवारी (८ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फरार झालेल्या कैद्यांवर बलात्कार, खून, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. दरम्यान, पोलिसांनी (Police) फरार झालेल्या कैद्यांच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कारागृहात ४ कैद्यांना ठेवण्यात आलं होतं.

बुधवारी पहाटेच्या सुमारास या कैद्यांनी कारागृहाचे गज तोडून धूम ठोकली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची झोपच उडाली. फरार झालेल्या कैद्यांच्या शोधात पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहे. गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले आरोपी कारागृहातून फरार झालेच कसे? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT