Ahmednagar Farmers Clash
Ahmednagar Farmers Clash saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Farmers Clash: शेतीच्या वादातून दोन गटात तुफान राडा! तलवारी, लोखंडी रॉडने हाणामारी; Video व्हायरल

Chandrakant Jagtap

>>सुशील थोरात, अहमदनगर

Ahmednagar Farmers Clash Video : अहमदनगरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर तालुक्यातील अकोळनेर येथे हा प्रकार घडला आहे. शेतातील रस्त्याच्या वादातून २ गट आमनेसामने आले आणि नंतर त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर तलवारी आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या घटनेत दोन्ही गटातील ७ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या शेतातील रस्त्यावर शेततळे बांधण्याच्या विषयावरून या दोन्ही गटात वाद झाल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडिओही आता समोर आला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादींवरुन १३ जणांसह इतर २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शेतातील रस्त्यावर एका गटाने शेततळे बांधण्यासाठी काम सुरू केले होते. या शेततळ्यावरून हा वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर नंतर जोरदार हाणामारीत झालं. यावेळी तलवारींसह लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना जबर मारहाण केली. (Crime News)

या तुफान हाणामारीत एका गटातील बाळासाहेब शंकर शेळके, आदेश बाळासाहेब शेळके, निलेश नाथा देशमुख, नाथा मुरलीधर देशमुख हे ४ जण तर दुसर्‍या गटातील सीताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारुडकर, शुभम सीताराम गारुडकर, विनायक सीताराम गारुडकर हे ३ असे एकूण ७ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT