Crime News 
महाराष्ट्र

नगर जिल्ह्यात दहावीतील मुलीचा खून; ५ जण पाेलिसांच्या ताब्यात

सचिन अगरवाल

नगर Crime News : नगर जिल्ह्यातील पारनेर parner तालुक्यातील जवळे येथील अल्पयवीन मुलीवर तिच्या घरातच अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. मुलगी एकटीच घरी असताना हा प्रकार घडला असून ही अल्पवयीन मुलगी जवळे येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकत होती. बुधवारी सकाळी मुलीचे पालक नेहमीप्रमाणे शेतात मजुरीसाठीर गेले तर तिचा भाऊ शाळेत गेला होता. मुलगी एकटीच घरी होती. दुपारी शाळेतून घरी आलेल्या मुलीच्या भावाने घरात प्रवेश करताच त्याला धक्का बसला. त्याची बहीण घरातील कॉटवर रक्ताच्या थाराेळ्यात आढळली.

त्यामुळे त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला घडलेला प्रकार लक्षात आला. हा प्रकार पाहून भयभीत झालेल्या भावाने मोठमोठ्याने हंबरडा फोडला. त्याच्या आवाजाने शेजारी राहणारे नागरिक तेथे आले. त्यांनी त्या मुलीला तत्काळ उपचारासाठी जवळे येथील दवाखान्यात नेले.

दरम्यान तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. शवविच्छेदनासाठी मृतदेह नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणांत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT