Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: अल्‍पवयीन मुलांनी फोडले मोबाईल शॉपी; पोलिस तपासात उलगडा

अल्‍पवयीन मुलांनी फोडले मोबाईल शॉपी; पोलिस तपासात उलगडा

साम टिव्ही ब्युरो

सुशिल थोरात

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील मोबाईल शॉपीचे दुकान फोडून लाखो रुपयांचे (Mobile) मोबाईल, स्मार्ट वॉचच्या चोरीचा उलगडा झाला आहे. या चोरीप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरी (Theft) करणारे चोर हे अल्पवयीन मुले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या चोरी प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना बीड (Beed) जिल्ह्यातील केळसांगवी गावातून ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

मिरजगांव येथील श्रीगणेश मोबाईल शॉपीचे दुकान फोडून मोबाईल फोन, स्मार्ट वॉच आणि रोख रक्कम असा सुमारे ३ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा माल चोरीला गेला होता. याबाबतची फिर्याद शेखर रामदास बनसोडे यांनी मिरजगांव पोलीस स्टेशन येथे नोंदवली होती. चोरीचा तपास करताना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड जिल्ह्यातील केळसांगवी या गावातून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कोंबड्याच्या खुराड्यामध्ये लपवला मुद्देमाल

विशेष म्हणजे या तीन अल्पवयीन मुलांनी हा सर्व माल आपल्या घराजवळील एका कोंबड्याच्या खुराड्यामध्ये लपवला होता. तिन्ही मुले सराईत चोर नसल्यामुळे पोलिसांना तपास करताना मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र दुकानातील काही गोष्टींच्या निरीक्षणावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या अल्पवयीन मुलांपर्यंत तपासाची दिशा नेली होती. अखेर या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आल्‍याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT