Ahmednagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: खळबळजनक! अहमदनगरमध्ये घरात साठवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त

Crime News: एमआयडीसी पोलिसांना या बाबातची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी छापेमारी केली.

Ruchika Jadhav

Ahmednagar News: अहमदनगर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. खरे कर्जुले गावातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १२ बॉम्ब, २५ किलो दारुगोळा आणि २५ पिस्तूल राउंड जप्त झाले आहे. एमआयडीसी पोलिसांना या बाबातची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी छापेमारी केली. यावेळी मोठा शास्त्र त्यांच्या हाती लागला. (Latest Marathi News)

रणगाड्याचे के. रेंज नावाचे एक प्रशिक्षण केंद्र अहमदनगर येथे आहे. प्रशिक्षण सुरू असताना टाकीतून काढलेले बॉम्ब दिले जातात. हे प्रशिक्षण सुरू असताना स्फोट न झालेले बॉम्ब जवानांकडून परत घेतले जातात.

के. रेंज प्रशिक्षण केंद्राचे क्षेत्रफळ फार मोठे आहे. हा संपूर्ण भाग जंगलाने व्यापलेला असल्याने स्फोट न झालेले बॉम्ब घेण्यासाठी लष्कराला तेथे पोहचणे कठीण होते. त्यामुळे येथील ग्रामस्त जंगलात फिरताना त्यांना सापडलेले बॉम्ब गोळा करतात. पुढे हे बॉम्ब फोडून ते भंगारात विकतात.

अशात या गावातील एका घरामध्ये अशाच पद्धतीने दारुगोळा आणि शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गावात छापा टाकला. यावेळी १२ बॉम्बसह, २५ किलोचा दारुगोळा आणि २५ पिस्तूल राउंड आढळले. या प्रकरणी पोलिसांनी अवैध शस्त्रसाठा बाळगल्या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलीस अधिक तपास करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला

BJP worker shot : भरदिवसा थरार! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; महाराष्ट्र हादरला

Health Care Tips: जेवणापूर्वी पाणी पिण्याची सवय रक्तातील साखरेवर नेमका कसा परिणाम करते?

आणखी एका राज्यातील सरकार कोसळणार; भाजप नेत्याच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Milk Honey Benefits: दररोज 1 ग्लास दूधात मध मिसळून पिण्याचे 7 फायदे; तिसरा फायदा वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT