Crime: माजी नगरसेविकेवर गोळीबार; Youtube वर पाहून त्याने बनवला घरीच कट्टा, पाेलिसांची माहिती गोविंद साळुंके
महाराष्ट्र

Crime: माजी नगरसेविकेवर गोळीबार; Youtube वर पाहून त्याने बनवला घरीच कट्टा, पाेलिसांची माहिती

राहुरी शहरात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका यांच्यावर २ दिवसापूर्वी गोळीबार झाला होता.

गोविंद साळुंके

अहमदनगर: राहुरी शहरात राष्ट्रवादीच्या (NCP) माजी नगरसेविका (Corporator) यांच्यावर २ दिवसापूर्वी गोळीबार (Firing) झाला होता. त्या प्रकरणी नाशिक परीक्षेत्राचे पोलीस (Police) महासंचालक बी जी शेखर यांनी घटनास्थळी समक्ष भेट दिली होती. दरम्यान कट्टा आणि बुलेट बनविण्याची हत्यारे साहित्य आरोपीकडून (accused) जप्त करण्यात आली आहेत. माजी नगरसेविका सोनाली बर्डे यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी अंकुश नामदेव पवार याच्यासह इतर आरोपींना अटक (Arrested) करण्यात आली आहे. (Ahmednagar Crime NCP Former corporator shot Youtube)

हे देखील पहा-

आरोपी याने या गुन्ह्यात जो कट्टा वापरला आहे, तो कट्टा त्याने स्वतः यूट्युबवर पाहून बनविला आहे. तो त्याने कसा तयार केला याची सविस्तर माहिती पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे. तो स्वतः च घरी कट्टा तयार करत होता. त्याने जवळच्या कचाट्यातून जुन्या वादातून माजी नगरसेविकेवर गोळी झाडली. यामध्ये माजी नगरसेविका जखमी झाल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

राहुरी शहरात ग्रामीण रुग्णालय परिसरात भिलहाटी येथे गावठी कट्ट्यातुन गोळीबार झाल्याची घटना घडलीये. या घटनेत माजी नगरसेविका सोनाली बर्डे या बालबाल बचावल्या आहेत. राहुरी पोलिसांनी या घटनेतील संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक माहिती राहुरी पोलीस करत आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी शहर हद्दीतील ग्रामीण रुग्णालय परिसरात अससेल्या भिलहाटी येथे गेल्या काही दिवसांपासून पवार व माळी या दोन गटांत काही कारणांवरून वाद सुरू होते. काही वेळा तुरळक हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT