Ahmednagar Latest News Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime निवडणुकीतील पराभवाचा राग.. गावगुंडांचा महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला; ग्रामस्थांनी पुकारले उपोषण

Ahmednagar Latest News: या हल्ल्यात सरपंच ज्योती घोरपडे यांच्यासहित त्यांची मुले आणि पती गंभीर जखमी झाले असून घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे...

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी...

Ahmednagar News: सरपंच पदाच्या निवडणूकीत पराभव झाल्याचा राग मनात ठेवून पाथर्डी तालुक्यातील वैजुबाभूळगाव गावातील महिला सरपंचाच्या कुटूंबावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले असून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सरपंच आणि गावातील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. (Ahmednagar Crime)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनात ठेवून वैजुबाभूळगावच्या महिला सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गावातील बाळासाहेब घोरपडे, ज्ञानेश्वर घोरपडे, साईनाथ घोरपडे, आंबादास घोरपडे, उत्तम घोरपडे,नितीन घोरपडे, सुशील घोरपडे, गणेश घोरपडे यांच्याकडून हा हल्ला केला.

या हल्ल्यात सरपंच ज्योती घोरपडे यांच्यासहित त्यांची मुले आणि पती गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचा व्हिडिओही (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र तरीही पोलिसांकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी लावला आहे.

पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आरोपींच्या अटकेची मागणी करत महिला सरपंचासह ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

जोपर्यंत या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील तसेच सरपंच पदासह इतर सदस्य सामूहिक राजीनामे देऊन या घटनेचा निषेध करणार असल्याचेही सरपंच ज्योती घोरपडे यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT