Ahmednagar- Kalyan Road Accident:  Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar Accident: मोठी बातमी! नगर- कल्याण रोडवर भीषण अपघात, चिमुकलीचा मृत्यू; ३ जखमी

Ahmednagar- Kalyan Road Accident: नगर - कल्याण रोडवर कर्जुले हद्दीमध्ये पहाटे पाच वाजता पिकअपचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. १३ एप्रिल २०२४

अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नगर - कल्याण रोडवर कर्जुले हद्दीमध्ये पहाटे पाच वाजता पिकअपचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर- कल्याण रोडवर (Ahmednagar Kalyan Road) आज पहाटे साडे पाच वाजता भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना नजिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची (Accident) माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअपमधील सर्व प्रवासी ही बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे सर्व जण मंचरहून पारनेरकडे यात्रेसाठी निघाल्याचेही सांगण्यात येत आहे.

जखमींच्या मदतीला धावले मंत्री संजय बनसोडे...

दरम्यान, लातूर -उदगीर महामार्गावरच्या करडखेल पाटी इथं दूचाकीवरून जात असताना एकाचा अपघात झाला, या अपघातात बालाजी लामतुरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रक्तस्त्राव होत होता, दरम्यान रात्री उशिरा उदगीर वरुन लातूरकडे निघालेले क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची मदत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT