Ahmednagar Breaking Saam Digital
महाराष्ट्र

Ahmednagar Breaking : धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या टेरेसवर डांबून ठेवलं, नेमक काय घडलं? VIDEO व्हायरल

Ahmednagar Breaking : अहमदनगरपासून जवळच असलेल्या एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या टेरेसवर हात-पाय आणि तोंड बांधून ठेवण्यात आलं होतं. एका अद्यात व्यक्तीने हे कृत्य केल्यामुळे खबळबळ माजली आहे.

Sandeep Gawade

अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगरपासून जवळच असलेल्या एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या टेरेसवर हात-पाय आणि तोंड बांधून ठेवण्यात आलं होतं. एका अद्यात व्यक्तीने हे कृत्य केल्यामुळे खबळबळ माजली आहे. दरम्यान अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचे तोंड दाबून तिला शाळेच्या टेरेसवर नेलं. तिचे हात, पाय आणि तोंड बांधून टेरेसवरचं सोडून अज्ञाताने तेथून पळ काढला . दरम्यान साडेपाच वाजता टेरेसवरून आवाज येत असल्याने गावातील काही ग्रामस्थ शाळेच्या टेरेसवर गेले आणि त्यांना धक्काच बसला.

पीडित मुलगी हात- पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मुलीला सोडवतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासानंतरच नेमका हा प्रकार काय आहे याची सत्यता समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT